युवकांच्या पुढाकारानेच व्यसनमुक्तीचा रथ पुढे जाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 05:00 AM2020-01-28T05:00:00+5:302020-01-28T05:00:22+5:30

तंबाखूचे व्यसन अनेकांना लागले आहे. अनेक युवक व महिलांचे खऱ्यामुळे तोंड उघडत नाही. यासाठी मोठ्या सामाजिक जनजागृतीची गरज आहे. त्यामुळे रासेयो ही मोठीच उपलब्धता असून या युवकांच्या पुढाकारानेच व्यसनमुक्तीचा रथ पुढे जाईल असे प्रतिपादन आरोग्य प्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष डॉ.सूर्यप्रकाश गभने यांनी केले.

It is with the initiative of the youth that the chariot of addiction will move forward | युवकांच्या पुढाकारानेच व्यसनमुक्तीचा रथ पुढे जाईल

युवकांच्या पुढाकारानेच व्यसनमुक्तीचा रथ पुढे जाईल

googlenewsNext
ठळक मुद्देसूर्यप्रकाश गभने : पिंपळगाव खांबी येथे रासेयो शिबिर, विद्यार्थ्यांनी घेतली व्यसन मुक्तीची शपथ

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : मोठ्या प्रमाणात युवक अंमली पदार्थांच्या आहारी जात आहेत. ग्रामीण भागात लहान मुलांपासून वयस्क स्त्रियापर्यंत खर्रा तंबाखूचे व्यसन अनेकांना लागले आहे. अनेक युवक व महिलांचे खऱ्यामुळे तोंड उघडत नाही. यासाठी मोठ्या सामाजिक जनजागृतीची गरज आहे. त्यामुळे रासेयो ही मोठीच उपलब्धता असून या युवकांच्या पुढाकारानेच व्यसनमुक्तीचा रथ पुढे जाईल असे प्रतिपादन आरोग्य प्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष डॉ.सूर्यप्रकाश गभने यांनी केले.
शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालय व पिंपळगाव खांबी ग्रामवासीयांच्या पुढाकाराने रासेयो शिबिरात व्यसनांचे समाजावरील दुष्परिणाम या चर्चासत्रात ते बोलत होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.आशिष कावळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच उर्मिला महेन्द्र मेश्राम, महेन्द्र मेश्राम, डॉ. प्रदिप भानसे, डॉ.एम आर दर्वे, कावळे होते. आरती पुराम यांनी आरोग्य प्रबोधिनीतर्फे तंबाखूचे दुष्परिणाम, कायदे, शासन परिपत्रके, तंबाखू मुक्त शाळांचा गोंदिया जिल्हा अभियान, तंबाखूची व्यसन मुक्ती या विषयावर सविस्तर माहिती दिली. डॉ.सूर्यप्रकाश गभने यांनी दारुचे दुष्परिणाम, युवकांमधील मद्यपानाची सुरुवात, दारुचा शरीरातील प्रवास व होणारे आजार, कुटुंबाची वाताहत याविषयी माहिती दिली. प्रा. कावळे यांनी दारु, तंबाखू या व्यसनांसोबतच मोबाईलचे व्यसन यावरही प्रकाश टाकला. महाविद्यालयातील रासेयो विद्यार्थी आरोग्य प्रबोधिनीच्या व्यसनमुक्ती उपक्र मात हिरीरीने सहभागी होतील अशी हमी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. एम.आर.दर्वे यांनी केले.संचालन केसर यांनी केले.

Web Title: It is with the initiative of the youth that the chariot of addiction will move forward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.