शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानभरपाई नाकारणाऱ्या विमा कंपनीला झटका

By admin | Updated: January 3, 2016 02:20 IST

वाहतुकीदरम्यान अवकाळी पावसाने खराब झालेल्या तांदळाची नुकसान भरपाई देण्यास नकार देणाऱ्या ओरिएंटल इन्शरन्स कंपनीला ...

ग्राहक न्यायमंचचा निर्णय : ४५ हजार ३८६ रूपये देण्याचे आदेशगोंदिया : वाहतुकीदरम्यान अवकाळी पावसाने खराब झालेल्या तांदळाची नुकसान भरपाई देण्यास नकार देणाऱ्या ओरिएंटल इन्शरन्स कंपनीला ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने चांगलाच झटका दिला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून कारणमिमांसा केली व ४५ हजार ३८६ रूपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश सदर विमा कंपनीला दिले.तक्रारदार शिवशंकर भगवानदास खंडेलवाल रा.तामखेडा (ता.जि. गोंदिया) असे ग्राहकाचे नाव आहे. बालाजी अ‍ॅग्रो प्रोडक्ट्स गोंदिया असे त्यांच्या फर्मचे नाव आहे. त्यांनी त्यांच्या फर्मचा आठ लाख रूपयांचा विमा ‘मराइन कार्गो ओपन पॉलिसी’ १४ मे २००९ ते २८ फेब्रुवारी २०१० या कालावधीसाठी ओरिएंटल इंशुरंस कंपनी शाखा गोंदियाकडून घेतली होती. सदर पॉलिसीनुसार तक्रारकर्त्यास त्यांच्या फर्ममार्फत पाठविण्यात येणाऱ्या मालाची नुकसान भरपाईचा खर्च विमा कंपनी देण्यास बांधिल असेल, असे नमूद होते.सदर फर्मने ८ नोव्हेंबर २००९ रोजी गोंदियावरून गांधीधाम कच्छ येथे मे. आंध्र-महाराष्ट्र रोडलाईन्स गोंदिया (ट्रक जीजे-१२/वाय-८४८०) या वाहनाद्वारे ८६८ पोती तांदूळ पाठविले होते. त्यात प्रत्येक पोतीमध्ये १९ किलो तांदूळ होते. या मालाच्या वाहतुकीपोटी २६ हजार ८८१ रूपये खर्च तक्रारदाराने दिलेला होता. परंतु माल वाहतुकीददरम्यान जोरदार अवकाळी पाऊस आले. त्यामुळे संपूर्ण माल व सदर धान्य भिजले व माणसांच्या खाण्यास अयोग्य ठरले. या प्रकारामुळे तक्रारदार खंडेलवाल यांनी सदर विमा कंपनीकडे दोन लाख ६६ हजार १६७ रूपये नुकसान भरपाईची रक्कम मागितली. मात्र ही नुकसान भरपाई देण्यास विमा कंपनीने नकार दिला. सदर नुकसानीबाबत खंडेलवाल यांनी तात्काळ विमा कंपनीस सूचित केले होते. त्या अनुषंगाने विमा कंपनीने सर्व्हेअर म्हणून जितेन ठक्कर यांची नियुक्ती केली. त्यांनी नुकसान भरपाईबाबत अहवाल तयार करून विमा कंपनीस पाठविला. विमा कंपनीने तो अहवाल स्वीकारला. त्या अहवालानुसार नुकसान भरपाईपोटी विमा रक्कम ४५ हजार ३८६ रूपये मिळण्यास पात्र ठरला. त्यामुळे तक्रारकर्त्याने जिल्हा ग्राहक मंचा येथे तक्रार योग्य त्या कागदपत्रांसह दाखल केली. जिल्हा ग्राहक मंचाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद व दोन्ही पक्षांनी सादर केलेले पुरावे व कागदपत्र यांची पडताळणी केली. त्यानंतर निकाल जाहीर केला. त्यानुसार ओरिएंटल विमा कंपनीने तक्रारदारास सर्व्हेअरच्या अहवालानुसार रक्कम ४५ हजार ३८६ रूपये नुकसान भरपाई द्यावे तसेच मानसिक त्राापोटी तीन हजार रू्ये व तक्रारीचा खर्च म्हणून दोन हजार रूपये द्यावे, असा आदेश दिला. सदर आदेश जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष अतुल आळशी व सदस्य वर्षा पाटील यांनी पारित केले. (प्रतिनिधी)