शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

नर्सिंग इमारत बांधकामाचे अधिकाऱ्यांना निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 00:56 IST

येथील एएनएम व जीएनएम नर्सिंग महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम लवकर सुरू करण्यासाठी आ. गोपालदास अग्रवाल यांनी आरोग्य विभागाचे ....

गोपालदास अग्रवाल : एएनएम-जीएनएम कोर्सेससाठी कोटा वाढविण्याचे प्रयत्नलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील एएनएम व जीएनएम नर्सिंग महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम लवकर सुरू करण्यासाठी आ. गोपालदास अग्रवाल यांनी आरोग्य विभागाचे सचिव प्रदीप व्यास व मंत्रालयीन अधिकाऱ्यांची बैठक मुंबईत घेतली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना इमारतीचे बांधकाम सुरू करण्याचे निर्देश दिले.आ. अग्रवाल म्हणाले, गोंदिया जिल्ह्यातील अनेक बेरोजगार युवक-युवतींना रोजगारोन्मुख शिक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जिल्ह्यात शासकीय एएनएम व जीएनएम नर्सिंग महाविद्यालयांना मंजुरी मिळवून दिली होती. परंतु दरवर्षी संस्थेमध्ये दोन्ही कोर्सेससाठी केवळ २०-२० विद्यार्थिनींनाच प्रवेशाचा कोटा आहे. मात्र प्रवेशासाठी दरवर्षी चार-पाच हजार अर्ज प्राप्त होत आहेत. यावरून जिल्ह्यात वाढणाऱ्या बेरोजगारीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत. अशात एकीकडे योग्य इमारतीच्या अभावाने शिक्षण संस्थेच्या कार्यात अडचण निर्माण होत आहे. तर दुसरीकडे भारतीय नर्सिंग कॉऊंसिलद्वारे २० विद्यार्थिनींचा संख्या वाढवून ५० करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना अपुऱ्या व्यवस्थेमुळे कोटा वाढत नाही. इमारतीच्या बांधकामासाठी शासनाकडून निधी उपलब्ध आहे. यानंतरही बांधकामास विलंब होत आहे. सदर बांधकाम त्वरित सुरू करण्यात यावे, असे निर्देश आ. अग्रवाल यांनी बैठकीत दिले. याप्रसंगी आरोग्य विभागाचे सचिव प्रदीप व्यास यांनी सांगितले, इमारत बांधकामासाठी आ. अग्रवाल यांच्या प्रयत्नांमुळेच गोंदियात जागा उपलब्ध झाली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला निधी देण्यात आला. बांधकामासाठी अंदाजपत्रक व प्रस्ताव तयार केले जात आहे. प्रस्तावाला बांधकाम विभागाची तांत्रिक मंजुरी घेवून मंजुरी देणे अपेक्षित आहे. बांधकामासाठी लागणाऱ्या १६ कोटींच्या निधीतून कार्य सुरू करण्यासाठी सदर निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला उपलब्ध करून देण्यात आला आहे. परंतु सा.बां. विभागाद्वारे विलंब केले जात आहे. या विभागाशी संपर्क साधून लवकरच बांधकाम सुरू करण्याचे आश्वासन बैठकीत व्यास यांनी दिले.बैठकीत आरोग्य विभागाचे निर्देशक सतीश पवारसुद्धा उपस्थित होते. आ. अग्रवाल यांच्या पुढाकाराने नर्सिंग महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू होणे व महाविद्यालयात २०-२० जागांच्या प्रवेशाचा कोटा वाढून ५०-५० जागा होण्याची शक्यता वाढली आहे.