शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

सहा दिवसांत ४४.७५ लाखाचे उत्पन्न

By admin | Updated: November 14, 2015 01:56 IST

दिवाळीमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्या असतात. विद्यार्थ्यांनाही सुट्या असतात. यात अनेक जण सहकुटुंब पर्यटनाला इतरत्र किंवा नातलगांच्या गावी जाण्याचा बेत आखतात.

गोंदिया आगार : दिवाळीसाठी १२ अतिरिक्त फेऱ्या सुरूगोंदिया : दिवाळीमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्या असतात. विद्यार्थ्यांनाही सुट्या असतात. यात अनेक जण सहकुटुंब पर्यटनाला इतरत्र किंवा नातलगांच्या गावी जाण्याचा बेत आखतात. मात्र त्यांचा हा बेत एसटी महामंडळाच्या बसेसद्वारे प्रवास केल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे दिवाळीसाठी एसटीनेही नियोजन केले असून प्रवाशांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे.एसटी महामंडळाच्या गोंदिया आगाराने यंदा दिवाळीसाठी अतिरिक्त वाढीव १२ फेऱ्यांचे नियोजन केले होते. त्यानुसार यंदा केवळ सहा दिवसांत गोंदिया आगाराला ४४ लाख ७५ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले. दिवाळी असताना व वाढीव फेऱ्या असतानाही एसटीचे कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असल्यामुळेच एसटी महामंडळाच्या गोंदिया आगाराला केवळ सहा दिवसातच ४५ लाखांच्या जवळपास मजल मारता आली.या उत्पन्नामध्ये केवळ ७ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबरपर्यंच्या उत्पन्नाचा समावेश आहे. गोंदिया आगाराला ७ नोव्हेंबर रोजी सात लाख ३४ हजार रूपये, ८ नोव्हेंबरला सात लाख ६५ हजार रूपये, ९ नोव्हेंबरला नऊ लाख १२ हजार रूपये, १० नोव्हेंबर रोजी आठ लाख ८३ हजार रूपये, ११ नोव्हेंबरला सात लाख ७३ हजार रूपये व १२ नोव्हेंबर रोजी चार लाख ८ हजार रूपये असा एकूण ४४ लाख ७५ हजार रूपयांचे उत्पन्न झाले. यंदा दिवाळीनिमित्त गोंदिया-नागपूरसाठी पाच फेऱ्या वाढविण्यात आल्या. यात जाणाऱ्या तीन फेऱ्या देवरी मार्गे व येणाऱ्या दोन फेऱ्या साकोली मार्गे, असे नियोजन करण्यात आले होते. याशिवाय गोंदिया-भंडारा बसेस तिरोडा व तुमसर मार्गे सुरू करण्यात आल्या. तर गोंदियावरून पूलगाव व आर्वी या लांब पल्ल्याच्या बसेसही सुरू करण्यात आल्या होत्या.