शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

ओलीत क्षेत्राच्या व्याख्येत सुधारणा करा- रहांगडाले

By admin | Updated: October 15, 2015 02:12 IST

ज्याप्रमाणे शासनाच्या आणेवारी पद्धतीत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, त्याचप्रमाणे शासनाच्या कृषी ओलीत क्षेत्राची व्याख्या बदलावी,

तिरोडा : ज्याप्रमाणे शासनाच्या आणेवारी पद्धतीत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, त्याचप्रमाणे शासनाच्या कृषी ओलीत क्षेत्राची व्याख्या बदलावी, अशी आपली मागणी असून याबाबत हिवाळी अधिवेशनात मागणी लावून धरणार असल्याची माहिती आ.विजय रहांगडाले यांनी दिली.तिरोडा क्षेत्रात ३० हजार हेक्टर कृषी क्षेत्र असून त्यात २३ हजार हेक्टर शेतीत खरीप व रबी हंगामात पिक घेतले जाते. ७ हजार हेक्टर शेती कोरडवाहू म्हटल्या जाते. मागील वर्षी धापेवाडा उपसा सिंचन योजनेमध्ये भारनियमनात परिवर्तन करुन सिंचन क्षेत्र वाढविण्यात सफलता प्राप्त करण्यात आली होती.भंडारा-गोंदिया जिल्हा हा लहान तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. या तलावात १५ ते २० दिवसाच्या पावसाची साठवणूक क्षमता असून २५ वर्ष जुनी क्षमता लक्षात घेतली जाते. राजस्व विभागाच्या रेकॉर्डनुसार ७/१२ वर ओलीत क्षेत्र नमूद केले असल्याने विविध योजनांचा लाभ घेता येत नाही. ७/१२ वरील ओलीत क्षमता ही ३ महिने, ६ महिने की १२ महिने याचा उल्लेख नसतो. फक्त १५ दिवस शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देवून महसूल व सिंचन विभाग ओलीत क्षेत्र दाखवून आणेवारी पद्धतीप्रमाणे ओलीत क्षेत्राची सुद्धा फसवणूक करीत आहे. त्यामुळे ज्यांना १५ दिवस पाणी मिळते त्यांना सुद्धा ओलीत समजून विविध योजनांपासून त्यांना वंचित ठेवण्यात येत आहे. मात्र याचे निकष बदलविल्यास शेतकऱ्यांना निश्चितपणे त्याचा फायदा होणार असल्याने आ.रहांगडाले यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उचलून ओलीत क्षेत्राच्या व्याख्येत परिवर्तनाची मागणी करणार असल्याचे आ.विजय रहांगडाले यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)