शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
5
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
6
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
7
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
9
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
10
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
11
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
12
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
13
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
14
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
15
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
16
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
17
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
18
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
19
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
20
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा

By admin | Updated: November 20, 2014 22:53 IST

जिल्ह्यातील नागरिकांना विविध मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासोबतच वैयक्तिक लाभांच्या योजनांचा लाभ देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा,

नाना पटोले : जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीची सभागोंदिया : जिल्ह्यातील नागरिकांना विविध मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासोबतच वैयक्तिक लाभांच्या योजनांचा लाभ देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, असे निर्देश जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष खा.नाना पटोले यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बुधवारला जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीच्या सभेत अध्यक्षस्थानावरुन खा.पटोले बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी सोरमारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पाडवी यांची प्रमुख उपस्थिती होती.खा.पटोले म्हणाले, ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तहसील कार्यालय येथे आयोजित लोकशाही दिनाला तालुका पातळीवरील सर्व विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी योग्य समन्वयातून पुढाकार घ्यावा. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची कामे करताना उत्कृष्ट दर्जाची कामे होतील याकडे लक्ष द्यावे. जिल्ह्यातील सर्व बँकांनी ग्राहकांसाठी बसण्यासाठी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, असेही खा.पटोले यांनी सांगितले. बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेवून ग्रामीण भागात इंटरनेट सेवा आणि मोबाईल सेवेसाठी चांगले कव्हरेज मिळाले पाहिजे याकडे लक्ष द्यावे, असेही खा.पटोले म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सैनी म्हणाले, जिल्ह्यात १७ मोबाईल टॉवर उभारण्यासाठी बीएसएनएलला वन विभागाकडून जमीन उपलब्ध करुन देण्यात येईल. मोबाईल टॉवर उभारणीमुळे बीएसएनएलच्या इंटरनेट व मोबाईल सेवेचे कव्हरेज चांगले मिळण्यास मदत होईल.प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत जिल्ह्यात १ ते ९ टप्प्यात २४१ रस्त्यांचे ८२७ कि.मी.ची कामे झाली आहेत. सन २०१३-१४ मध्ये १३ पुलांचे कामे प्रगतीपथावर आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात ६१३ कामे सुरू आहे. या कामांवर ४६२३ मजूर काम करीत आहे. जिल्ह्यात स्वतंत्र ३८८ ग्रामीण पाणी पुरवठा योजना कार्यरत असून त्यापैकी केवळ ६ योजना नादुरुस्त आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ५५६ ग्रामपंचायतीपैकी ३२७ ग्रामपंचायतींना निर्मल ग्राम पुरस्कार मिळाले आहे. राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेंतर्गत ७३१ गावांचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेंतर्गत ७३१ गावांचे विद्युतीकरण करण्यात आले. जिल्ह्यातील ७४ हजार ७८९ घरगुती लाभार्थ्यांना विद्युतीकरण योजनेचा लाभ देण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.सभेला आमगाव, देवरी व सडक/अर्जुनी पंचायत समितीचे सभापती, जि.प. सदस्य तसेच विविध विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. (जिल्हा प्रतिनिधी)