शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
3
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
4
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
5
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
6
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
7
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
8
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
9
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
10
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
13
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
14
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
15
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
16
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
17
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
18
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
19
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
20
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

सुभाष बागेतील रखडलेली कामे त्वरित सुरू करा : कदम

By admin | Updated: December 27, 2015 02:17 IST

शहराच्या मध्यवस्तीमधील सुभाष बागेत प्रलंबित असलेली विकास कामे रखडली असल्याने ती त्वरित सुरू करण्याची मागणी प्रभाग क्र. ६ च्या नगरसेविका भावना कदम यांनी केली आहे.

गोंदिया : शहराच्या मध्यवस्तीमधील सुभाष बागेत प्रलंबित असलेली विकास कामे रखडली असल्याने ती त्वरित सुरू करण्याची मागणी प्रभाग क्र. ६ च्या नगरसेविका भावना कदम यांनी केली आहे. यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. गोंदिया शहरात शुद्ध हवेसाठी दररोज पहाटेपासून मोठ्या प्रमाणात नागरिक येतात. सर्व वयोगटातील महिला व पुरूषवर्गासाठी सुभाष बाग हे एकमेव गार्डन आहे. पण येथे महिला व पुरुषांसाठी शौचालय नाही, झाडांना पाणी देण्यासाठी बांधण्यात आलेली टाकी अनेक वर्षापासून बंद पडून आहे. यासाठी नवीन बोअरवेल खोदून पाण्याची टाकी सुरू करण्याची गरज आहे. हुतात्मा स्मारकाला दुरुस्तीच गरज आहे. युवकांसाठी असलेले व्यायामाचे साहित्य तुटलेले असून नवीन साहित्यांची गरज आहे. बागेत मागील १० वर्षांपासून माळी नाही. बागेसाठी माळीची नियुक्ती करण्याची गरज आहे. नागरिकांना बसण्यासाठी शेड व खुर्च्या नसून व्यवस्था करायची आहे. मात्र नगर परिषदेकडून या सर्व कामांकडे दुर्लक्ष केले जात आहे.या बागेत लहान्यांपासून ते वृद्धापर्यंत सर्वांची गैरसोय होत आहे. ही कामे त्वरित सुरू करण्याची मागणी नगरसेविका भावना कदम यांनी केली आहे. आपल्या मागण्यांना घेवून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे.