शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

सिंदीटोलाच्या मंदिर परिसरात अवैध उत्खनन

By admin | Updated: January 7, 2016 02:22 IST

तिरोडा तालुक्यातील करटी बु. येथून ३ किमी अंतरावर असलेल्या सिंदीटोला पहाडीवर सती अनुसया मातेचे मंदिर आहे.

६० फूट खोल उत्खनन : महसूल विभागाचे होतेय दुर्लक्षपरसवाडा : तिरोडा तालुक्यातील करटी बु. येथून ३ किमी अंतरावर असलेल्या सिंदीटोला पहाडीवर सती अनुसया मातेचे मंदिर आहे. त्या ठिकाणी शिवलींग, दुर्गा माता, माँ बम्लेश्वरीचे मंदिर आहे. मंदिराच्या समोरच ६० ते ७० फुट खोल अवैध उत्खनन करण्यात आले. त्याठिकाणी भाविकांना येता-जाताना पाय घसरल्यास ही बाब त्यांच्या जीवावर बेतू शकते. या ठिकाणी देऊळ असले तरी खनीज अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी न करता परवानगी दिली कशी अशा प्रश्न भाविक व नोरिकांना पडला आहे. याठिकाणी मातेच्या मंदिरात गर्दी असायची. यात्रा भरत असे पण जेव्हापासून खनीज विभागाने खनीज उत्खननाला प्रोत्साहन दिले. तेव्हापासून अवैध उत्खनन त्या परीसरात होत आहे. काही भाविकांनी विरोध केला पण पैसावाल्यांच्या समोर गरीबाची कोण अधिकारी ऐकतो अशी गत झाली. समोरील जागेत अवैध मुरूम काढण्यात आले. त्या ठिकाणी आता ही खोदकाम केलेले खड्डे आहेत. महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी कुंभकर्णी झोपेत आहे. याचा त्रास नागरिकांना होत आहे. एखादा शेतकरी व नागरिकाने घर कामाकरिता गीट्टी किंवा मुरूम नेले तर त्याच्यावर दंड आकारून पोलीसात गुन्हा नोंदवितात. अवैध उत्खनन करून कंत्राटदाराने मातेच्या मंदिराचे दृष्य हरपून गेले असून मंदिर परिसराचे दृष्य विद्रुप केले आहे. त्या अवैध उत्खनन करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी आहे. परवानगी शिवाय मुरूमाचे अवैध उत्खनन कसे झाले हे महसूल अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याप्रकरणात लाखो रूपयाचे गौण खनिज चोरीला गेले आहे. त्यामुळए महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाई करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)