शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मागेल त्याला सिंचन विहीर अंतर्गत १४० विहिरी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 06:00 IST

तालुक्यातील उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालय लपाजिप उपविभागाच्या वतीने आॅनलाईनद्वारे अर्ज मागविण्यात आले होते. तालुुक्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांनी शेतामध्ये जलसिंचनाची सोय होऊन बारमाही पाणी उपलब्ध करुन घेण्यासाठी ८०५ शेतकऱ्यांनी आॅनलाईनद्वारे १३ हजार सिंचन विहीर योजने अंतर्गत विहिरीचा लाभ मिळण्यासाठी अर्ज केले होते. प्राप्त अर्जापैकी ९२ अर्ज अपात्र करुन ७१३ अर्ज पात्र होते.

ठळक मुद्देअनुदानाचा अभाव : विहिरी बांधकामाला संथगती

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : मागेल त्याला १३ हजार सिंचन विहीर योजने अंतर्गत अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ३१ मार्च २०१९ च्या स्तरावर अर्जुनी-मोरगाव तालुक्यात १४० विहिरी मंजूर झाल्या. सबंधीत कार्यालयाच्यावतीने विहिरी बांधकाम करण्यात येते. या कार्यालयात अद्यापही अनुदानाची रक्कम उपलब्ध नसल्याने बांधकाम रखडले आहे.तालुक्यातील उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालय लपाजिप उपविभागाच्या वतीने ऑनलाईनद्वारे अर्ज मागविण्यात आले होते.तालुुक्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांनी शेतामध्ये जलसिंचनाची सोय होऊन बारमाही पाणी उपलब्ध करुन घेण्यासाठी ८०५ शेतकऱ्यांनी ऑनलाईनद्वारे १३ हजार सिंचन विहीर योजने अंतर्गत विहिरीचा लाभ मिळण्यासाठी अर्ज केले होते. प्राप्त अर्जापैकी ९२ अर्ज अपात्र करुन ७१३ अर्ज पात्र होते. शेतामधून हमखास उत्पादन घेण्यासाठी शेतात विहिरीची सोय व्हावी म्हणून मोठ्या प्रमाणात अर्ज ऑनलाईन केले होते.सदर योजने अंतर्गत निवड झालेल्या पात्र लाभार्थ्याना प्रती विहीर अनुदान २ लाख ५० हजाराचे रुपये दिले जाते. सदर विहिरीमध्ये बोअरवेल खोदण्याची सुध्दा सुविधा आहे. तालुक्यातील ८०५ शेतकऱ्यांनी विहिरीचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईनद्वारे अर्ज केले असले तरी त्यातील फक्त १४० विहिरी मंजूर होऊन पात्र लाभार्थ्याची निवड करण्यात आली.१२५ लाभार्थ्यांचे करारमार्च महिना सुरु झाला असला तरी विहीर बांधकामाच्या खोदकामाला पाहिजे त्या प्रमाणात प्रारंभ झाला नसल्याने तालुक्यात विहिरीचे बांधकाम अत्यंत कासवगतीने सुरु असल्याचे चित्र आहे. १४० मंजूर विहिरींपैकी सध्या स्थितीत केवळ १२५ निवड झालेल्या पात्र लाभार्थ्यानीच करारनामे केले आहे. मंजूर विहिरीपैकी सध्या ५० विहिरीचे बांधकाम सुरु असल्याचे दिसून येत आहे.बांधकामाकडे प्रत्यक्ष लक्ष नाहीअनुदानाअभावी पात्र लाभार्थ्यांनी कामांचा शुभारंभ केल्या नसल्याचे सांगण्यात येते. अधिक माहिती घेतली असता जे कंत्राटदार नित्यनेम कार्यालयाचे पायऱ्या झिजवितात त्याच्याकडे सबंधितांची चांगली मेहेरबानी असल्याचे बोलले जाते. सबंधित अधिकारी प्रत्यक्ष विहीर बांधकाम खोदकामाकडे जातात की नाही हे कळायला मार्गच नाही. गरजू लाभार्थी अनुदानाअभावी आजही विहीर बांधकाम करण्यास अनुदान मिळत नसल्याने अनुउत्सुक असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना