शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शेकडो गटई कामगार अजूनही उघडयावरच

By admin | Updated: July 10, 2014 23:39 IST

जिल्ह्यातील सर्व गटई कामगारांना समाजकल्याण विभागाकडून लोखंडी स्टॉल मिळून सुध्दा आजही जिल्ह्यातील शेकडो गटई कामगार रस्त्याच्या किंवा चौकाच्या कोपऱ्यात उघड्यावर आपले ठाण मांडून बसत आहेत.

गोंदिया : जिल्ह्यातील सर्व गटई कामगारांना समाजकल्याण विभागाकडून लोखंडी स्टॉल मिळून सुध्दा आजही जिल्ह्यातील शेकडो गटई कामगार रस्त्याच्या किंवा चौकाच्या कोपऱ्यात उघड्यावर आपले ठाण मांडून बसत आहेत. त्यामुळे त्यांना वर्षभर उन-पावसाचा तडाखा सहन करावा लागत आहे.
त्यांना मिळालेले लोखंडी स्टॉल कचऱ्यात धूळखात पडलेले आहेत. त्यांना जंग लागल्यामुळे निकामी व नष्ठ होण्याच्या मार्गावर आहेत. ही परिस्थिती पाहून असे वाटते की गटई कामगारांना शासनाकडून मिळणारी मदत वाया जात असते. तर चर्मकारांची आर्थिक परिस्थिती जैसे थे दिसून येत आहे.
गटई कामगार उघड्यावर बसून जोडे-चपला दुरूस्ती किंवा विक्री करीत असल्याचे मुख्य कारण असे की ज्या लोकांच्या घरासमोर किंवा जागे समोर ते आपले लोखंडी स्टॉल मांडू इच्छितात ते लोक त्या ठिकाणी जागा देत नाही. त्यांना असे वाटते की एक वेळा लोखंडी स्टॉल ठेवायला जागा दिली तर त्यावर ते कायमचा आपला हक्कम जमावतील व भविष्यात त्यांना हटविता येवू शकणार नाही. काही जागा मालक तर असे आहेत की, आपल्या जागेसमोर त्यांना उघड्यावर सुध्दा दुकान मांडू देत नाही. एवढेच नाहीतर आपल्या घरासमोर असलेल्या शासकीय जागेवर सुध्दा बसू देत नाही. त्यामुळे अनेकांना सोयीस्कर ठिकाणी दुकान मांडण्यासाठी मोठी पंचाईत होत असते.
चपला-जोडे विकण्याचा व तयार करण्याचा व्यवसाय हा आता एका जणापुरता मर्यादीत राहीला नसून कोणीही या व्यवसायात विनियोग करून अर्थार्जन करू शकतो. त्याचप्रमाणे चर्मकार लोक चर्मकाम करण्याच्या पूर्ती स्वत:ला अकडवून न ठेवता वाटेल तो व्यवसाय करून आपली आर्थिक परिस्थती भक्कम करू लागले आहेत. पिढ्यांपिढ्यापासून अनेक कुटुंब हाच व्यवसाय करीत असल्याचे दिसते. शासन त्यांच्या उत्थानासाठी प्रयत्न करीत आहे.
समाज ग्रामीण भागात सामाजीक प्रवाहापासून वेगळाच राहतो. इतर समाजीत लोक त्यांना आपल्या कोणत्याही काम काजात सम्मिलीत करीत नाही किंवा त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होत नाही. त्यामुळे गावातील सामाजीक ऐक्य निर्माण होण्यास अडचण निर्माण होत असते.
चर्मकामगारांचा अनुसूचीत जातीमध्ये समावेश असून त्यांच्यावर जातीय अत्याचार झाल्यास अ‍ॅट्रासिटी कायद्याअंतर्गत आपले संरक्षण करून ते सन्मानाने जगू शकतात. परंतू या समाजाचे लोक मृदू स्वाभावाचे व समाजातील इतर लोकांशी नमते घेवून जीवन यापन करीत असल्याने त्यांना कोणी दुकान लावायला जागा देत नाही. (तालुका प्रतिनिधी)