शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीने जिल्ह्यातील ३६ शाळा उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 05:00 IST

जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगलाच कहर केला. सन २००५ मध्ये आलेल्या पुरालाही यंदाच्या पुराच्या मागे टाकले. या पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिवाय कित्येकांची घरे, गोठे पडली. या पुराने जिल्ह्यातील ८ तालुक्यात असलेल्या जिल्हा परिषद शाळांनाही सोडले नाही. जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांची संख्या एक हजार ३९ आहे. परंतु पुरामुळे यापैकी ३६ शाळा जमीनदोस्त झाल्या आहेत.

ठळक मुद्देशाळांचे १.१६ कोटींचे नुकसान । तालुक्यातील सर्वाधिक २० शाळांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदाच्या पावासाळ्यात जून व जुलै या महिन्यांत पावसाने दडी मारली. परंतु ऑगस्ट महिन्यात सुरूवातीपासून अखरेपर्यंत आलेल्या दमदार पावासाने जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पुराने जिल्ह्यातील ३ तालुक्यांतील ३६ शाळांना उद्ध्वस्त केले. यात १.१६ कोटी रूपयांचे नुकसान झाले असून तालुक्यातील सर्वाधिक २० शाळांचा यात समावेश आहे.जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगलाच कहर केला. सन २००५ मध्ये आलेल्या पुरालाही यंदाच्या पुराच्या मागे टाकले. या पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिवाय कित्येकांची घरे, गोठे पडली. या पुराने जिल्ह्यातील ८ तालुक्यात असलेल्या जिल्हा परिषद शाळांनाही सोडले नाही. जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांची संख्या एक हजार ३९ आहे. परंतु पुरामुळे यापैकी ३६ शाळा जमीनदोस्त झाल्या आहेत. यात, आमगाव तालुक्यातील ५ शाळा, गोंदिया तालुक्यातील २० शाळा तर तिरोडा तालुक्यातील ११ शाळा अशा एकूण ३६ शाळांचा समावेश आहे. त्या सर्व शाळांचे पंचनामे करण्यात आले आहे. अर्जुनी-मोरगाव, देवरी, सालेकसा, गोरेगाव व सडक-अर्जुनी या ५ तालुक्यांत पुराची भिषणता तेवढी नव्हती. त्यामुळे शाळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकले नाही. मात्र गोंदिया, तिरोडा व आमगाव या ३ तालुक्यांतील नदीच्या काठावर असलेल्या गावांतील शाळांचे नुकसान झाले आहे. आमगाव तालुक्यातील ५ शाळांना बाघनदीच्या पुरामुळे धोका निर्माण झाला होता. गोंदिया तालुक्यातील २० शाळा बाघनदी व वैनगंगा नदीच्या पुरामुळे ध्वस्त झाल्या. तर तिरोडा तालुक्यातील ११ शाळा वैनगंगेच्या पुराने पडल्या.गोंदिया तालुक्यात सर्वाधिक नुकसानजिल्ह्यातील गोंदिया, आमगाव व तिरोडा या ३ तालुक्यांतील ३६ शाळांचे नुकसान झाले ते एक कोटी १६ लाखांच्या घरात आहे. यामध्ये, आमगाव तालुक्यातील ५ शाळांचे १६ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. गोंदिया तालुक्यातील २० शाळांचे ६४ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. तर तिरोडा तालुक्यातील ११ शाळांचे ३६ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. त्याचा पंचनामा करण्यात आला आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर