शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

क्लोरोफिनच्या गोळ्या खाऊन आरोग्य सेविकाची आत्महत्या

By admin | Updated: March 19, 2017 00:29 IST

तालुक्यातील घोनाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सिरानडोह उपकेंद्रांतर्गत कार्यरत आरोग्य सेविका रेखा शिंदे (गोफने) यांनी क्लोरोफीन गोळ्यांचे ....

देवरी : तालुक्यातील घोनाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सिरानडोह उपकेंद्रांतर्गत कार्यरत आरोग्य सेविका रेखा शिंदे (गोफने) यांनी क्लोरोफीन गोळ्यांचे अत्याधिक सेवन करुन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी ११ वाजताची आहे. प्राप्त माहितीनुसारस, आरोग्य सविका रेखा शिंदे (गोफने) बऱ्याच वर्षापासून घोनाडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत होत्या. शनिवारला (दि.१८) घोनाडीला मिटिंगसाठी गेल्या होत्या. तिथे अत्याधिक गोळ्याचे सेवन केल्यानंतर प्रकृती बिघडली असता चिचगड ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथे उपचारात सुधारणा न झाल्याने गोंदिया येथे रेफन करताना रस्त्यातच मृत्यू झाला. देवरी येथे ग्रामीण रुग्णालयात आणले असता रुग्ण वाहिकेत डॉ. भोंगाडे यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. विशेष म्हणजे सदर आरोग्य सेविकेला दीड वर्षाची मुलगी असून पती अजुन गोफने अरुणनगर (मोरगाव अर्जुनी) येथे जि.प. प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या आरोग्य सेविकेला काही वर्षापूर्वी तालुका आरोग्य अधिकाऱ्याकडून मानसिक त्रास झाल्याने व पैशाची मागणी केल्याने त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी नागपुरे यांची लाचलूचपत विभागाकडे तक्रार करुन त्यांचेवर कायदेशीर कारवाई केली होती. आरोग्य सेविका रेखा शिंदे यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप कळू शकले नाही. पोलीस तपास करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)