शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
2
Latest Marathi News LIVE: LIVE: नाशिक TCS प्रकरण: शाहरूख कुरेशी, रझा मेमनला ५ दिवसांची पोलीस कोठडी
3
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
4
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
5
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
6
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
7
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
8
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
9
पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?
10
Lord Shiva Temple Demolished: तेलंगणामध्ये शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट!
11
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
12
नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 
13
जन्मदाता बापच झाला हैवान; संपत्तीच्या वादात नातेवाईकांना अडकवण्यासाठी घेतला मुलाचा बळी
14
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
15
प. बंगालमध्ये हिंसाचार सुरू असतानाच भाजप 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; केंद्र सरकारने थेट यादीच मागवली
16
Chandranath Rath: बिहारचे शार्प शूटर्स अन् ४० लाखांची सुपारी; चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात मोठा खुलासा
17
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
18
नवरी जोमात, नवरा कोमात! फोटो काढले, हार घातले पण ऐन मुहूर्तावर 'ती' गायब; लग्नात खळबळ
19
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
20
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च करणार
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभाग झाला पांगळा

By admin | Updated: December 18, 2014 01:19 IST

जिल्ह्याच्या आरोग्य विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची शेकडो पदे मंजूर असताना ती अद्याप भरण्यात आलेली नाहीत.

देवानंद शहारे गोंदिया
जिल्ह्याच्या आरोग्य विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची शेकडो पदे मंजूर असताना ती अद्याप भरण्यात आलेली नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील १४ लाख नागरिकांच्या आरोग्य सेवेचा भार तोकड्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पडत आहे. यात जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अधिकार क्षेत्रांतर्गत एकूण ३६३ पदे तर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या अधिकारांतर्गत येणाऱ्या भागात १०३ अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.
जिल्ह्यातील केटीएस, बीजीडब्ल्यू व सर्व ग्रामीण रूग्णालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकूण ९११ पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ ५४८ पदे भरलेली आहेत. विशेष म्हणजे सर्व ग्रामीण रुग्णालयात वर्ग-१ अधिकाऱ्यांचे प्रत्येकी एक पद मंजूर आहे. मात्र सर्वच रुग्णालयात ते पद रिक्त आहे.
जिल्हा सामान्य रूग्णालयात वर्ग-१ ची १८ मंजूर आहेत. त्यापैकी ११ पदे रिक्त आहेत. याशिवाय वर्ग-२ ची ४ पदे, वर्ग-३ ची ९० पदे आणि वर्ग-४ ची ७८ पदे रिक्त आहेत. जिल्हा क्षयरोग केंद्रांतर्गत वर्ग-१ व वर्ग-२ चे प्रत्येकी एक पद मंजूर असून ते दोन्ही रिक्त आहेत. वर्ग-३ ची ३ आणि वर्ग-४ ची ८ पदे रिक्त आहेत.
जिल्ह्यातील एकमेव सरकारी महिला व बाल रूग्णालय असलेल्या बाई गंगाबाई रुणालयात वर्ग-१ ची ५ पैकी २ पदे रिक्त आहेत. वर्ग-२ चे एक पद, वर्ग-३ ची ४१ पदे रिक्त व वर्ग-४ ची ३० पदे रिक्त आहेत.
तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात वर्ग-३ ची ४ पदे रिक्त आणि वर्ग-४ ची ३ पदे रिक्त आहेत. देवरी ग्रामीण रूग्णालयात वर्ग-३ ची २ पदे व वर्ग-४ ची ४ पदे रिक्त आहेत. चिचगड ग्रामीण रूग्णालयात वर्ग-३ ची २ पदे आणि वर्ग-४ ची ३ पदे रिक्त आहेत. अर्जुनी/मोरगाव ग्रामीण रूग्णालयात वर्ग-२ चे एक पद, वर्ग-३ ची ४ पदे आणि वर्ग-४ ची ३ पदे रिक्त आहेत. नवेगावबांध ग्रामीण रूग्णालयात वर्ग-२ चे एक पद, वर्ग-३ ची ५ पदे आणि वर्ग-४ ची ३ पदे रिक्त आहेत. सडक/अर्जुनी ग्रामीण रूग्णालयात वर्ग-३ ची ५ पदे तर वर्ग-४ ची ४ पदे रिक्त आहेत.
सालेकसा ग्रामीण रूग्णालयात वर्ग-३ ची ४ पदे व वर्ग-४ ची ४ पदे रिक्त आहेत. आमगाव ग्रामीण रूग्णालयात वर्ग-४ ची ३ पदे रिक्त आहेत. गोरेगाव ग्रामीण रूग्णालयात वर्ग-२ चे एक तर वर्ग-३ चे एक पद रिक्त आहे. रजेगाव ग्रामीण रूग्णालयात वर्ग-२ चे एक पद, वर्ग-३ ची ५ पदे आणि वर्ग-४ ची ३ पदे रिक्त आहेत.
सौंदड ग्रामीण रूग्णालयात वर्ग-३ ची १० पदे रिक्त आणि वर्ग-४ ची ६ पदे रिक्त आहेत.
ग्रामीण क्षेत्रांतर्गत रिक्त असलेली पदे
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या अधिकार क्षेत्रांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकूण १०३ पदे रिक्त आहेत. यात वर्ग-१ चे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे एक पद, जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांची दोन पदे व एडीएचएसची (कुष्ठरोग) तीन पदे रिक्त आहेत. वर्ग-२ ची ७१ पदे मंजूर असून ६४ पदे भरली तर सात पदे रिक्त आहेत. वर्ग-२ च्या गट ब मध्ये ५२ पैकी एक पद रिक्त आहे. आरोग्य पर्यवेक्षकांची १७ पैकी ४ पदे रिक्त, आरोग्य सहायकांची (पुरूष) ६४ पैकी ३ पदे, आरोग्य सहायक (महिला) ४० पैकी ३ पदे, एमपीडब्ल्यू (पुरूष) १६६ पैकी २९ पदे, एमपीडब्ल्यू (महिला) २८२ पैकी ४४ पदे रिक्त आहेत. तसेच औषध निर्मात्यांची ४५ पदे मंजूर असून ४ पदे रिक्त, तथा आशा स्वयंसेविकांची १,००१ पदे मंजूर असून ३ पदे रिक्त आहेत.