शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट जनावरांचे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: December 18, 2014 22:58 IST

दरवर्षी होणारी अवैध वृक्षतोड आणि दिवसेंदिवस प्लास्टिकच्या वाढणाऱ्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडल्याच्या सूचना जागतिक स्तराच्या तज्ज्ञांकडून वेळोवेळी प्रसारित करण्यात येत आहेत.

रावणवाडी : दरवर्षी होणारी अवैध वृक्षतोड आणि दिवसेंदिवस प्लास्टिकच्या वाढणाऱ्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडल्याच्या सूचना जागतिक स्तराच्या तज्ज्ञांकडून वेळोवेळी प्रसारित करण्यात येत आहेत. मात्र प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालून पर्यावरणाचा समतोल राखणे शक्य होणार नाही. या प्लास्टिक पिशव्या ठिकठिकाणी पडलेल्या असून जनावरांकडून त्या इतर खाद्यपदार्थांसोबत खाल्ल्या जात आहेत. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
यावेळी अस्तित्वात असलेल्या खाद्य पदार्थांची पॅकींग विशिष्ट व सर्व वातावरण सहन करण्याऱ्या सिलबंद प्लास्टीक पिशव्यात केली जाते. या खाद्य पदार्थांची विक्री सर्वत्र जोमात होवून या पिशव्या प्रत्येक ठिकाणी साचतात. गावच्या परिसरात मोठ्याने अस्तव्यस्त पसरल्याचे त्या दिसतात. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्लास्टीक वस्तुचा उपयोग हल्लीच्या काळात मोठ्या जोमाने फोफावला आहे. कोणत्याही ठिकाणी कोणताही समारंभ असो किंवा लग्न सोहळा असो यात मोठ्या प्रमाणात प्लास्टीक वस्तुंची उधळपट्टी करण्यात येते. अल्प काळासाठी उपयोग करुन कुठेही मोकळी जागा दिसली की त्या ठिकाणी या वस्तू फेकून मोकळे होत असतात. शासनाने ५० मॉयकानपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक पिशव्यांवर बंदी घातली. मात्र बहुतांश व्यवसायीक जाडीदार ठिसूळ प्लास्टीक पिशव्यांचा वापर करतात. त्या अल्प काळातच जमिनीत मुरुन नाहीशा होत आहेत. मात्र खाद्य पदार्थांच्या पॅकींगमध्ये येत असलेल्या प्लास्टीक पिशव्या मजबूत, टिकावू व दर्जेदार असल्यामुळे त्या बऱ्याच काळापर्यंत टिकून राहतात. एकदा या पिशवीत खाद्यपदार्थ भरुन पॅकींग झाल्यावर या पॉकीटमधून थोडीसुद्धा हवा बाहेर निघत नाही.
या खाद्य पदार्थांच्या पॉकीटमधून खाद्यपदार्थ खावून उरलेल्या प्लास्टीक पिशव्या चालता फिरता कुठेही फेकल्या जातात. त्यामुळे पाळीव आणि मोकाट जनावरे त्या पिशव्या खावून मोठ्या संख्येने मृत पावल्या आहेत. तर काही प्लास्टीक पिशव्या सांडपाणी वाहणाऱ्या नालीत साचून अडकून राहिल्याचे दिसून येतात. त्यामुळे सांडपाण्याचा निचराही होत नाही.
शासनाने प्लास्टीक पिशव्यावर बंदी घातली आहे. परंतु खाद्यपदार्थांच्या हवाबंद प्लास्टीक पिशव्यांना यातून वगळण्याचे काय कारण असावे, हे संबंधित प्रशासनालाच माहीत? या खाद्य पदार्थांच्या पिशव्या जागोजागी पसरत असल्यामुळे गावचा चेहरा-मोहरा बदलत आहे. पूर्वी बऱ्याच वस्तूंची पॅकींग टिकावू दर्जेदार प्लास्टीक पिशव्यात केली जात होती. मात्र बऱ्याच उत्पादकांनी पॅकींगचे प्लास्टीक बदलून कागद मिश्रित प्लास्टीकच्या पॉकिटांचा उपयोग सुरू केला आहे. मात्र सध्या बाजारात व गावागावातील लहान मोठ्या दुकानदाराजवळ खाद्यपदार्थांची विक्री जोमात होत आहे. मात्र संबंधित विभागाने काही व्यवसायिकांना प्लास्टीक पिशव्यांच्या वापराची मुभा दिल्याचेच दिसून येते. (वार्ताहर)