शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

निराश्रितांना दिली त्यांनी मायेची ऊब

By admin | Updated: December 26, 2015 01:55 IST

त्यांचे वय जेमतेम १३ ते १५ वर्षाचे. खेळण्याबागडण्याच्या या वयात सामाजिक भान वगैरे गोष्टी कळतही नाहीत. पण गोंदियातील काही ...

वर्गणीतून शालींचे वाटप : शाळकरी मुलांची अशीही सहृदयतागोंदिया : त्यांचे वय जेमतेम १३ ते १५ वर्षाचे. खेळण्याबागडण्याच्या या वयात सामाजिक भान वगैरे गोष्टी कळतही नाहीत. पण गोंदियातील काही शाळकरी बालकांनी केवळ सामाजिक भान जपलेच नाही तर त्यांना मायेची ऊब देण्यासाठी केलेले काम अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरले आहे. शहरातील विवेकानंद कॉलनी आणि साईनगरात राहणारी ही बालकं आहेत आठवी आणि नववीत शिकणारी. समाजातील रंजल्या गांजल्यांसाठी काहीतरी करावे या सामाजिक जाणीवेतून त्यांनी ‘बिइंग ह्युमन’ हा ग्रुप स्थापन केला आणि आपल्या परिसरात वर्गणी गोळा करणे सुरू केले. पण नेमके काय करता येईल हे ठरले नव्हते. यातच ते आपली शिक्षिका मिनाक्षी साकला यांच्याकडे वर्गणी मागण्यासाठी गेले. साकला यांनीही त्यांना कुतूहलाने या वर्गणीतून नेमके काय करणार, असा प्रश्न त्यांना केला. पण त्यांच्या उत्तराने त्यांचे समाधान झाले नाही. शिक्षिका साकला यांनी त्या बालकांना उघड्यावर थंडीत कुडकुडणाऱ्या लोकांबद्दल सांगून त्यांना ऊब देण्यासाठी शालींचे वाटप करण्याची कल्पना सुचविली. मुलांनाही ही कल्पना आवडली.जमलेल्या पैशातून या मुलांनी १५ शाली आणल्या. खऱ्या गरजूंना त्या शाली मिळाल्या पाहीजे म्हणून रात्री रेल्वे स्थानक गाठले. तेथे उघड्यावर झोपलेल्या काही लोकांना शाली दिल्या. याशिवाई साई मंदिर, हनुमान मंदिरसमोर बसलेल्या असहाय वृद्ध, अपंगांना शाली दिल्या. या बालकांना खरे तर अजून अशाच अनेक लोकांना शालींसोबत इतरही मदत करायची आहे. पण त्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नाहीत. आपल्या या ग्रुपशी गोरगरीबांना मदत करू इच्छिणाऱ्या लोकांनी जुळावे आणि शक्य ती मदत करावी अशी या बालकांची इच्छा आहे. त्यांचे हे कार्य सर्वासाठी प्रेरणादायी ठरले आहे.निराश्रितांबद्दल आत्मियता दाखवून लहान वयात असा सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या या बालकांमध्ये रोहीत कोसरे, दीप खंडेलवाल, योगेश चौधरी, बादल कुंभलकर, यश कोसरे, यश रहांगडाले या बालकांचा समावेश आहे. कोणाला त्यांच्या या कार्यात मदत करायची असेल तर त्यांनी ९९२३१४२०५५ या क्रमांकावर संपर्क करावा असेही आवाहन त्यांनी केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)