एचआयव्ही बाधित रुग्णावर केली नियमित शल्यकक्षात शल्यक्रि या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 06:00 AM2020-01-15T06:00:00+5:302020-01-15T06:00:13+5:30

स्थानिक ग्रामीण रुग्णालयात ७ जानेवारी रोजी हायड्रोसिल शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १८ रु ग्णांनी नोंदणी केली. यापैकी ६ रुग्णांना इतर आजार असल्याने वगळण्यात आले. यात बाधित रुग्णाचा समावेश होता. परंतु त्याला एचआयव्हीमुळे नाही तर मधुमेह असल्याने वगळण्यात आले होते. शेवटी १४ रुग्णांवर चिकित्सक डॉ. तुरकर यांनी शल्यक्रिया केल्या.

Have regular surgery performed on an HIV-infected patient | एचआयव्ही बाधित रुग्णावर केली नियमित शल्यकक्षात शल्यक्रि या

एचआयव्ही बाधित रुग्णावर केली नियमित शल्यकक्षात शल्यक्रि या

Next
ठळक मुद्देबाधित रूग्णावर शल्यक्रि येनंतर इतर रु ग्णांवर झाल्या शल्यक्रि या : ग्रामीण रुग्णालयातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : एका एचआयव्ही बाधित रुग्णावर हायड्रोसिलची शल्यक्रिया कुठलीही दक्षता न बाळगता नियमित शल्यक्रिया कक्षात करण्यात आली. त्यानंतर आणखी काही रुग्णांवर शल्यक्रिया करण्यात आल्याची खळबळजनक घटना स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उघडकीस आली आहे. बाधित रु ग्ण अत्यवस्थ असून नागपूर येथे उपचार घेत असल्याचे समजते.
स्थानिक ग्रामीण रुग्णालयात ७ जानेवारी रोजी हायड्रोसिल शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १८ रु ग्णांनी नोंदणी केली. यापैकी ६ रुग्णांना इतर आजार असल्याने वगळण्यात आले. यात बाधित रुग्णाचा समावेश होता. परंतु त्याला एचआयव्हीमुळे नाही तर मधुमेह असल्याने वगळण्यात आले होते. शेवटी १४ रुग्णांवर चिकित्सक डॉ. तुरकर यांनी शल्यक्रिया केल्या. शल्यक्रियेपूर्वी रुग्णालयातील पोशाख दिला जातो तो सर्वांनाच देण्यात आला होता.
बाधित रुग्ण पोशाख घालून बिछान्यावर बसून होता. आधी तीन रुग्णावर शल्यक्रिया करण्यात आली. चवथ्या क्रमांकावर बाधित रुग्णाला नियमित शल्यक्रिया कक्षात घेऊन त्याचेवर हायड्रोसिलची शल्यक्रि या करण्यात आली. शल्यक्रि येच्या एक दिवसापूर्वी कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करण्यात आली होती. यात प्रयोगशाळा तंत्रज्ञ होता मात्र दुसºया दिवशी प्रयोगशाळा तंत्रज्ञाला बोलाविण्यात आले. त्याने सर्वच रुग्णाची तपासणी केली. बाधित रुग्णाचा निगेटिव्ह अहवाल आला. रूग्णाने सुद्धा डॉक्टरांना बाधित असल्याचे सांगितले नाही. त्यामुळे हायड्रोसिलची शल्यक्रिया करण्यात आली. आधी येथे एचआयव्ही तपासणीसाठी आयसीडी केंद्र होते. येथे तपासणी करणारे संजय टाकसांडे रुग्णालयात आले. त्यांना बाधित रुग्ण दिसला. तेव्हा त्यांनी हा रुग्ण बाधित असल्याचे सांगून त्याचेवर एआरटी गोंदिया येथून दहा वर्षांपासून औषधोपचार सुरू असल्याचे सांगितले. असे समजताच एकच खळबळ माजली. शल्यक्रि या कक्षाचे काय? ही चिंता रुग्णालय प्रशासनाला सतावत होती. शेवटी शल्यक्रि या कक्षातील टॉवेल, कपडे व इतर वस्तू जाळण्यात आल्या. तो कक्ष निर्जंतुकीकरण करण्यात आला. शल्यक्रिया झालेल्या रुग्णांना रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले असताना संधी साधून हा रुग्ण घरी पळून गेला. रुग्णालयीन दाखल कार्डवर असलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर परिचारिकेने संर्पक करून त्याला औषधे नेण्यासाठी बोलावले.त्याचे कुटुंबीयांनी रु ग्णालयात येऊन औषधे नेल्याच्या चर्चा आहेत.
रविवारी बाधित रु ग्ण अस्वस्थ असल्याने त्याला परत ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला नागपूर येथे हलविण्यात आले. तिथूनही परत आणण्यात आले असून तो सद्या अत्यवस्थ असल्याचे कळते. यापूर्वी एचआयव्ही चाचणी करण्याची व्यवस्था ग्रामीण रुग्णालयात होती. मात्र जिल्ह्यात सर्वच ग्रामीण रुग्णालयात असलेली ही सुविधा बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात सद्या ही व्यवस्था केवळ केटीएस सामान्य रुग्णालयात उपलब्ध असल्याचे समजते. ही व्यवस्था प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.

रूग्णाने याची माहिती दिली नाही - डॉ अकिनवार
या घटनेसंदर्भात वैद्यकीय अधीक्षक डॉ.अकिनवार यांच्याशी संर्पक साधला असता त्यांनी हा प्रकार घडल्याची कबुली दिली. मात्र रुग्णाने बाधित असल्याचे सांगायला हवे होते. शल्यक्रि या कक्ष व रुग्णाची तशी सुविधा केली असती.तो रुग्ण बाधित असल्याची कुणालाच कल्पना नव्हती. कोणताही हेतू नव्हता. ती तांत्रिक चूक आहे. एचआयव्ही तपासणी संच (किट) अहवाल निगेटिव्ह आल्याने शल्यक्रिया पार पडली. तपासणी किट सुद्धा खराब असू शकते. शल्यक्रिया कक्षाची अत्यंत काळजी घेतली जाते. कक्षात प्रवेश करणाºयाची तपासणी अहवाल आल्याशिवाय प्रवेशच दिला जात नाही. हे प्रकरण समजल्यानंतर तीन दिवस शल्यक्रि या कक्षाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. तेथील कपडे व इतर वस्तू नष्ट करण्यात आल्या. आता शल्यक्रि या कक्ष सुसज्ज आहे. बाधित रुग्णांवर शल्यक्रि या केल्या जातात मात्र त्याची माहिती मिळाल्यास विशेष किंवा स्वतंत्र शल्यक्रिया कक्ष तयार केले जाते मात्र माहितीच नव्हती. अशी माहिती डॉ. अकिनवार यांनी लोकमतशी बोलताना दिली.
 

Web Title: Have regular surgery performed on an HIV-infected patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.