शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

‘शो पीस’ ठरत आहेत शहरातील हॅँडवॉश स्टेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 05:00 IST

कोरोनापासून सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी बाजारात तसेच कार्यालयात आल्यास प्रथम येथे हात धुवावे हा या मागील मुख्य उद्देश होता.सुरूवातीला काही दिवस हा प्रयोग नियमितपणे राबविण्यात आला. नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिला. आजघडीला काही ठिकाणचे हे हँडवॉश स्टेशन उपयोगात दिसत नसून एका कोपऱ्यात पडून असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

ठळक मुद्देवापर न करता कोपऱ्यात पडून : ना सॅनिटायझर, ना साबण, उपाययोजनेकरिता नगर परिषदेने झटकले हात

कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील बाजार तसेच कार्यालयांत येणाºया नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हात स्वच्छ धुण्यासाठी नगर परिषदेने हँडवॉश स्टेशन लावले आहेत. मात्र आजघडीला या हँडवॉश स्टेशनचा वापर होत नसून ते एका कोपऱ्यात पडलेले दिसत आहे. शिवाय, यामध्ये ना सॅनिटायझर आहे ना साधी साबण अशात हे हँडवॉश स्टेशन फक्त ‘शो पीस’ ठरत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे याला प्रतिबंध लावण्यासाठी प्रशासनातर्फे विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे. मात्र यात सातत्याने नसल्याने या उपाययोजनांचाच पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्थानिक नगर परिषदेने नागरिकांची ये-जा असलेल्या ठिकाणांवर हँडवॉश स्टेशन लावले होते.यात नगर परिषद कार्यालय, सुभाष शाळेतील बाजार, हिंदी टाऊन शाळेतील बाजार, स्टेडियममधील बाजार, नवीन प्रशासकीय इमारत, न्यायालय व सर्कस मैदान जवळील हनुमान मंदिर येथे अशा ७ ठिकाणी हँडवॉश स्टेशन ठेवले होते. यांतर्गत, एका लोखंडी स्टँडमध्ये पाण्याची टाकी बसवून सोबतच सॅनिटायजर ठेवले जात होते.कोरोनापासून सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी बाजारात तसेच कार्यालयात आल्यास प्रथम येथे हात धुवावे हा या मागील मुख्य उद्देश होता.सुरूवातीला काही दिवस हा प्रयोग नियमितपणे राबविण्यात आला. नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिला. आजघडीला काही ठिकाणचे हे हँडवॉश स्टेशन उपयोगात दिसत नसून एका कोपऱ्यात पडून असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.या हँडवॉश स्टेशनमध्ये अग्निशमन विभागाची गाडी येऊन पाणी टाकते.मात्र सोबत सॅनिटाझजर किंवा साबण तेथे असणे गरजेचे आहे. पण सध्या स्थितीत या हँडवॉश स्टेशनमध्ये ना सॅनिटायझर, ना साबण दिसत आहे. म्हणूनच नगर परिषदेने लावलेले हँडवॉश स्टेशन आजघडीला फक्त ‘शो पीस’ ठरत आहेत.फक्त पैशांची नासाडीनगर परिषदेने एका चांगल्या उद्देशातून हे हँडवॉश स्टेशन लावले होते, यात शंका नाही. मात्र त्यांच्या देखरेखीकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांची तुटफुट झाली आहे. आठ हजार रूपये किंमतीचे एक या प्रमाणे शहरात ५६ हजार रूपये खर्च करून ७ हँडवॉश स्टेशन लावण्यात आले आहेत. मात्र त्यांची तुटफुट व उपयोग होत नसल्याने फक्त पैशांची नासाडी केल्याचे चित्र आहे.सुभाष शाळेतील स्टेशन कचऱ्यातनगर परिषदेने सुभाष शाळेत भरत असलेल्या बाजारात येणाऱ्या नागरिकांसाठी हँडवॉश स्टेशन लावले होते. मात्र आजघडीला त्याची तोडफोड करण्यात आली असून कुजलेल्या भाज्या टाकतात त्या कोपºयात टाकून देण्यात आले आहे. हात धुण्यासाठी असलेल्या पाण्याचा वापर भाजीवाले भाज्या धुण्यासाठी करत असल्याचेही ऐकीवात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या