शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांना ‘शो कॉज’

By admin | Updated: July 10, 2014 23:39 IST

विविध मागण्यांसाठी २ जुलैपासून कामबंद आंदोलनावर असलेल्या ग्रामसेवकांना ‘शो कॉज’ नोटीस देण्यात आली आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशावरून पंचायत समिती

गोंदिया : विविध मागण्यांसाठी २ जुलैपासून कामबंद आंदोलनावर असलेल्या ग्रामसेवकांना ‘शो कॉज’ नोटीस देण्यात आली आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशावरून पंचायत समिती खंडविकास अधिकाऱ्यांनी गुरूवारी ही नोटीस दिल्याची माहिती आहे. यामुळे आंदोलनात सहभागी जिल्हयातील सुमारे ३३५ ग्रामसेवक अडचणीत येण्याचे चित्र दिसून येत आहे.
ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची वेतन त्रुटी दूर करणे, ग्राम पंचायत स्तरावर नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणे, २० ग्राम पंचायतींमागे एक विस्तार अधिकारी पद निर्माण करणे यासह अन्य मागण्यांसाठी ग्रामसेवकांचे २ जुलै पासून राज्यस्तरावर आंदोलन सुरू आहे.
या आंदोलनांतर्गत जिल्ह्यातील सुमारे ३३५ ग्रामसेवक सहभागी असून त्यांनी ग्राम पंचायतला कुलूप ठोकून कक्ष अधिकाऱ्यांना चाब्या दिल्या होत्या. यामुळे ग्राम पंचायतींचे कामकाज विस्कटल्याने नागरिकांची ओरड सुरू होती. ही बाब लक्षात घेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समिती खंडविकास अधिकाऱ्यांना ग्रामसेवकांना त्यांच्या या कृत्याबद्दल कारणे दाखवा नोटीस देण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या या आदेशावरून खंडविकास अधिकाऱ्यांनी आंदोलनावर असलेल्या ग्रामसेवकांना नोटीस पाठविल्याची माहिती आहे. त्यामुळे आता आंदोलनात सहभागी असलेल्या ग्रामसेवकांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत ग्रामसेवक संघाचे जिल्हा अध्यक्ष कार्तिक चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही नोटीस देण्यात आल्याचे सांगीतले. तर संघटनेचे तालुकाध्यक्ष रूद्रकार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सध्या बाहेर असून अद्याप पत्र मिळाले नसल्याचे सांगितले. (शहर प्रतिनिधी)