शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामगीता भागवत सप्ताहाची सांगता

By admin | Updated: November 17, 2014 22:57 IST

जवळच असलेल्या घुसोबाटोला येथील हभप फलहारी महाराज यांच्या अविरत प्रयत्नाने व नियमित वास्तव्याने हजारो भाविकांचे श्रध्दास्थान बसलेले श्रीक्षेत्र रामकृष्ण मंदिर जानकी आश्रम त्रिकुट

बोंडगावदेवी : जवळच असलेल्या घुसोबाटोला येथील हभप फलहारी महाराज यांच्या अविरत प्रयत्नाने व नियमित वास्तव्याने हजारो भाविकांचे श्रध्दास्थान बसलेले श्रीक्षेत्र रामकृष्ण मंदिर जानकी आश्रम त्रिकुट पहाडी येथे मागील सात दिवसांपासून सुरू असलेले श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ ग्रामगीता संतकथा सप्ताहाची सांगता कीर्तन प्रवचनाने झाली. यावेळी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. भागवत सप्ताहाच्या सांगता समारंभाला खा. नाना पटोले प्रामुख्याने उपस्थित होते. त्रिकुट पहाडी या श्रध्दास्थानी उपस्थित हजारो भाविकांना मार्गदर्शन करताना खा. नाना पटोले म्हणाले, समाजातील तळागाळातील जनसामान्यांची सेवा हिच खरी ईश्वरसेवा आहे. समाजावर कोणतीही आपत्ती आली तरी न घाबरता हिंमतीने दूर करता येतात. फलहारी महाराज हे समाज व्यसनमुक्त करण्यासाठी अविरत परिश्रम घेत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. दिग्रस येथील हभप रामेश्वर खोडे महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले, समाजाला दिशा देण्याकरिता आणि आदर्श समाज घडविण्याकरिता महानत्यागी कर्मयोगी संत गाडगे महाराजांनी संसाराचा त्याग केला. राजा शुध्दोधनाचे चिरंजीव तथागत भगवान गौतम बुध्दांनी आपला राजवैभव सोडून गृहत्याग केला. श्रावण बाळाने आई-बाबाच्या सुखाकरिता देह त्यागले. याप्रमाणे असामान्य कर्तृत्ववान मानव समाजात होऊन गेले. सर्व जगात भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे. अशा पवित्र संस्कृतीला कलंक लागेल अशी कृती आजच्या युवकांनी करू नये. समाजाचे भाग्यविधाता ठरणाऱ्या युवकांनी व्यसनाधिनतेला तिलांजली देऊन एक नवा आदर्श घडवावा, असे आवाहन त्यांनी केले. खाडे महाराज पुढे म्हणाले की, गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी समाज जागृतीकरिता आपले आयुष्य खर्ची घातले. गावोगावी जावून कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले. त्यांनी आपल्या वाणीतून सर्व जनतेला अंधश्रध्दा व व्यसनाधिनतेपासून रोखले. व्यसन व अंधश्रध्देमुळे संसाराची राखरांगोळी कशी होते हे त्यांनी पारखले होते. आजची युवा पिढी व्यसनाधिनतेच्या आहारी गेली आहे. दारूच्या नशेत नको ते कार्य युवकांकडून घडून अनेकदा कौटुंबीक आणि सामाजिक ऐक्य धोक्यात येते. आयुष्याची राखरांगोळी होते. समाजामध्ये नवचैतन्य निर्माण होऊन गावागावात शांतात अबाधित राहण्यासाठी गावातून मदिरा हद्दपार होण्जासाढू गावात दारूबंदी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. सात दिवस खोडे महाराज यांनी आपल्या अमृतवाणीने बोधामृत पाजले. त्यांच्या मार्गदर्शनात ९७ लोकांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केला.