शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
5
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
6
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
7
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
8
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
9
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
10
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
11
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
12
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
13
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
14
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
15
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
16
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
18
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
19
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
20
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतचे उमेदवारी अर्ज ऑफलाईन स्विकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 05:00 IST

राज्यातील मुदत संपलेल्या १४ हजार ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला हाेवू घातली आहे. यासाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी ऑनलाईन उमेवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. सुट्या वगळता चार दिवसांच्या कालावधीत राज्यात केवळ ३ लाख ३२ हजार ८४४ उमेदवारी अर्ज दाखल झाले. २८ डिसेंबरला इंटरनेट आणि ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे संकेत स्थळ बंद असल्याने हजारो उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता आले नाही. त्यामुळे निवडणूक लढवू इच्छिणारे उमेवार अडचणीत आले होते. 

ठळक मुद्देराज्य निवडणूक आयोगाचा निर्णय : इंटरनेटची असल्याने समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अट लागू केली होती. मात्र ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी इंटनेटची समस्या येत असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अडचण होत होती. याचीच दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने आता ऑफलाईन अर्ज स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे. ३० डिसेंबरला सायंकाळी ५.३० पर्यंत ऑफलाईन अर्ज स्विकारले जाणार आहे. राज्यातील मुदत संपलेल्या १४ हजार ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला हाेवू घातली आहे. यासाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी ऑनलाईन उमेवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. सुट्या वगळता चार दिवसांच्या कालावधीत राज्यात केवळ ३ लाख ३२ हजार ८४४ उमेदवारी अर्ज दाखल झाले. २८ डिसेंबरला इंटरनेट आणि ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे संकेत स्थळ बंद असल्याने हजारो उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता आले नाही. त्यामुळे निवडणूक लढवू इच्छिणारे उमेवार अडचणीत आले होते. ही अडचण लक्षात घेवून आ. विनोद अग्रवाल यांनी सोमवारी राज्याचे निवडणूक आयुक्त मदान यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन ऑफलाईन उमेदवारी अर्ज स्विकारण्याची मागणी केली होती. त्यावर मदान यांनी सुध्दा सकारात्मक प्रतिसाद दिला होता. राज्यात इतर ठिकाणी या संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याची दखल राज्य निवडणूक आयोगाने आता उमेदवारांचे ऑफलाईन अर्ज स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे. ३० डिसेंबरला सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व तालुका स्तरावर उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज स्विकारले जाणार आहे. निवडणूूक लढवू इच्छिणाऱ्या हजारो उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भातील पत्र सुध्दा मंगळवारी काढले आहे. जात प्रणाणपत्र तपासणीचे अर्ज सुध्दा घेणार ऑफलाईन ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरक्षित प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. मात्र यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अट होती. पण ग्रामीण भागात इंटरनेटच्या समस्येमुळे ऑनलाईन अर्ज करणे अडचणीचे जात होते. ही समस्या लक्षात घेवून आ. विनोद अग्रवाल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे महासंचालकांशी चर्चा करुन ऑफलाईन अर्ज स्विकारण्या संदर्भात चर्चा केली होती. त्यानंतर हे अर्ज सुध्दा ऑफ लाईन बुधवारी रात्री उशीरापर्यंत स्विकारले जाणार आहे.चार दिवसात केवळ ६६ अर्जजिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींची निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. यासाठी २३ डिसेंबरपासूृन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. सुट्या वगळता मागील चार दिवसात केवळ ६६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. ऑनलाईन प्रकियेमुळे उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अडचण जात होती. त्यामुळे चार दिवसात केवळ ६६ अर्ज दाखल झाले होते.  

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक