शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुनीतील ‘एमआयडीसी’ला येणार अच्छे दिन

By admin | Updated: December 6, 2015 01:43 IST

जवळच्या निमगाव येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ लघु औद्योगिक क्षेत्र मोरगाव/अर्जुनीत मुलभूत सोयी सुविधा ...

पालकमंत्र्यांनी केले भूमिपूजन : उद्योगांसाठी विविध सोयी-सुविधा पुरविणारअर्जुनी मोरगाव : जवळच्या निमगाव येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ लघु औद्योगिक क्षेत्र मोरगाव/अर्जुनीत मुलभूत सोयी सुविधा पुरविण्याच्या कामाचे भूमिपूजन राज्याचे सामाजिक व न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते शुक्रवारी पूजापाठ करुन करण्यात आले.निमगाव जवळील ११.९१ हेक्टरमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ लघु औद्योगिक क्षेत्र बनविण्यात येणार आहे. सदर एमआयडीसीमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या मुलभूत सोयी- सुविधा पुरविण्याच्या कामाचे भूमिपूजन ना.बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पं.स. सभापती अरविंद शिवणकर, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, निमगाव ग्रा.पं. सरपंच देवाजी डोंगरे, जि.प. सदस्या कमल पाऊलझगडे, पं.स. सदस्या पिंगळा ब्राम्हणकर, भाजपा नेते विनोद नाकाडे, संदीप कापगते, माजी पं.स. सदस्य अल्का बांबोळे आदी उपस्थित होते. अर्जुनी मोरगाव तालुक्यात एमआयडीसी निर्माण घेवून उद्योगात भर पडून तालुक्यातील बेरोजगारांना कामाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी २० वर्षापूर्वी निमगाव येथील शेतकऱ्यांची ११.९१ हे.आर. शेतजमिन खरेदी करुन ती जमीन एमआयडीसीच्या नावाने सातबाऱ्यावर नोंद सुद्धा करण्यात आली होती. यावेळी लघुऔद्योगिक क्षेत्राचे कार्यकारी अभियंता सुनील आकुलवार, साई कन्स्ट्रक्शन कंपनी चंद्रपूरचे राजेश बियानी, एमआयडीसीचे क्षेत्र व्यवस्थापक ए.आर. भामरे, उपअभियंता एस.टी. ईरावार तसेच निमगाव येथील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. एमआयडीसी जागेवरील भूमिपूजन सोहळा नाममात्र न राहता तीव्र गतीने मुलभूत सोईसुविधा निर्माण होऊन उद्योगाची फळी निर्माण व्हावी अशी प्रतिक्रिया सामान्य जनतेकडून व्यक्त होत आहेत. सदर जागेमधून सहा भूखंडाचे वाटप करण्यात आल्याचे एमआयडीसीचे भामरे यांनी लोकमतला सांगितले. यामुळे एमआयडीसीत उद्योगांना चालना मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे. (शहर प्रतिनिधी)