शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

मत्स्यपालन संस्थांना येणार ‘अच्छे दिन’

By admin | Updated: October 18, 2015 02:11 IST

गोंदिया जिल्हा तलावाचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातोे. त्यामुळे येथील मत्स्यउद्योगाला भरपूर वाव आहे. जिल्ह्यात आजघडीला १३३ मत्स्य सहकारी संस्था नोंदणीकृत आहेत.

नाव होणार जिल्ह्याचे : पटोले यांचे आश्वासनबाराभाटी : गोंदिया जिल्हा तलावाचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातोे. त्यामुळे येथील मत्स्यउद्योगाला भरपूर वाव आहे. जिल्ह्यात आजघडीला १३३ मत्स्य सहकारी संस्था नोंदणीकृत आहेत. त्यापैकी १२६ संस्था कार्यरत आहेत. ९१५० सभासद या व्यवसायावर आपले जीवन जगत आहेत. त्यांच्या मागण्यांवर खा.नाना पटोले यांनी सकारात्मत प्रतिसाद दिला.तलावातून भरघोष मत्स्योपादन होत नाही. याचे कारण संस्थेकडे तुटपुंजे असलेले भांडवल, तलावांचे न झालेले खोलीकरण, वाढलेला कचरा, शासनाकडून मिळणारी अपुरी मदत, आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव अशा अनेक समस्यांनी ग्रस्त अशा या मत्स्योद्योगाला शासकीय मदतीची गरज आहे. ज्याप्रमाणे शासन विविध उद्योगाला सोयी, सवलती देतो त्यानुसारच मत्स्योद्योगाला सोयी, सवलती प्रदान केल्या तर गोंदिया जिल्हा भाताचा, तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. उद्या हाच जिल्हा गोड्या पाण्यातील मास्यांचा जिल्हा म्हणून नावारुपास येईल.बुधवारला जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील मत्स्य पालन संस्थाची सभा घेण्यात आली. सभेला खा. नाना पटोले उपस्थित होते. मत्स्य उद्योगाला नवसंजीवनी प्रदान करुन उद्योगाला भरभराटीस कसे नेता येईल यासाठी त्यांनी आश्वासने दिली. ते आश्वासन कृतीत आणण्याचे अभिवचन दिले. जि.प.चे तलाव म.पा.संस्थालाच पूर्वीप्रमाणे देण्यात येतील. त्यात कसलाही फेरबदल केला जाणार नाही. २०० हेक्टरचे वर असलेल्या तलावाचे लिलाव न करता कार्यक्षेत्रातील संस्थेलाच देण्यात येतील. अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई उरलेल्या संस्थाना देण्याचे आदेश देण्यात आले. प्रत्येक संस्थांना सदस्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून भरीव मदत करण्यात येईल. जि.प. व पाटबंधारे तलाव आरक्षण पद्धतीने संस्थेलाच मिळतील. भविष्यात संस्थाकडून लिज घेणार नसल्याचे धोरण शासनाचे असल्याचे खा. नाना पटोलें यांनी सांगितले. चोरखमारा, चुलबंद व कटंगी जलाशय यांचे ओपण लिलाव झाले. परंतु यापुढे ते संस्थेलाच देण्यात येतील असे आवार्जून सांगितले. सभेला सुरगाव संस्थेचे अध्यक्ष दिलवर रामटेके, कोटरा संस्थेचे अध्यक्ष विनोद मेश्राम, हनुजी हुमने, बोंडगावदेवीचे अध्यक्ष ताराचंद मेश्राम, कालिदास बावने, दिघोरे, कोल्हे असे १२० सदस्य उपस्थित होते. (वार्ताहर)