शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 06:00 IST

गोंदिया जिल्हा परिषदेचा पाच वर्षांचा कार्यकाळ जून २०२० मध्ये पूर्ण होत आहे.त्यापूर्वी जि.प.च्या निवडणुका होणे निश्चित आहे. मागील पाच वर्ष जि.प.अध्यक्षपद अनुसूचित जमाती (महिला) साठी राखीव होते. तर मंगळवारी काढण्यात आलेल्या सोडतीत पुढील पाच वर्षांसाठी जि.प.अध्यक्षपदाच्या सोडतीत जि.प.अध्यक्षपद सर्वसाधारण झाले आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीत वाढणार चुरस : आजी माजी सदस्य झाले सक्रिय, इच्छुकही लागले कामाला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यभरातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाची आरक्षण सोडत मंगळवारी (दि.१९) मुंबई येथे काढण्यात आली. या सोडतीकडे अख्या राज्याचे लक्ष लागले होते. यावेळी काढण्यात आलेल्या सोडतीत गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे खुले(सर्वसाधारण) झाले आहे.त्यामुळे सहा महिन्यांनी होणाऱ्या जि.प.च्या निवडणुकीत चूरस पाहयला मिळणार आहे.गोंदिया जिल्हा परिषदेचा पाच वर्षांचा कार्यकाळ जून २०२० मध्ये पूर्ण होत आहे.त्यापूर्वी जि.प.च्या निवडणुका होणे निश्चित आहे. मागील पाच वर्ष जि.प.अध्यक्षपद अनुसूचित जमाती (महिला) साठी राखीव होते. तर मंगळवारी काढण्यात आलेल्या सोडतीत पुढील पाच वर्षांसाठी जि.प.अध्यक्षपदाच्या सोडतीत जि.प.अध्यक्षपद सर्वसाधारण झाले आहे.त्यामुळे कोणत्याही प्रवर्गाच्या सदस्याला अध्यक्ष बनण्याची संधी आहे. त्यामुळे सहा महिन्यांनी होणाºया जि.प.च्या निवडणुकीत दिग्गज उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.यामुळे या निवडणुकीत चूरस पाहयला मिळू शकते.भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे विभाजन होऊन १ मे १९९९ मध्ये गोंदिया जिल्हा परिषदेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर म्हणजे मागील १९ वर्षांच्या कालावधीत एकदा जि.प.अध्यक्षपद सर्वसाधारण झाले होते. त्यानंतर मंगळवारी काढण्यात आलेल्या सोडतीत दुसऱ्यांदा गोंदिया जि.प.चे अध्यक्षपद हे सर्वसाधारण झाले आहे. गोंदिया जि.प.एकूण ५३ सदस्यीय असून मागील साडेचार वर्षांपासून काँग्रेस-भाजप अभद्र युतीची सत्ता आहे.तर पक्षीय बलाबल पाहिले असता राष्ट्रवादी काँग्रेस २०,काँग्रेस १६ आणि भाजपचे १७ सदस्य आहेत. विद्यमान पदाधिकारी आणि सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाल जून २०२० मध्ये संपुष्टात येत आहे.त्यामुळे यासाठी निवडणुका होणार असून त्या दृष्टीकोनातून सर्वच राजकीय पक्ष आणि निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी तयारी सुरू केल्याचे चित्र आहे.तर आता अध्यक्षपद खुले झाले असल्याने कोणत्याही प्रवर्गाच्या सदस्याला अध्यक्ष होता येणार आहे.त्यामुळे अध्यक्षपद आरुढ होण्यासाठी अनेकांच्या इच्छा पल्लवीत झाल्या असून बहुमताचा आकडा गाठून आपल्या पक्षाची सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये सुध्दा चढाओढ पाहयला मिळणार आहे. याकडे नजरा लागल्या आहे.कार्यक्रमातून जनसंपर्क वाढविण्यावर भरसहा महिन्यांनी जि.प.ची निवडणूक होऊ घातली आहे. ती लक्षात घेऊन आजी माजी जि.प.सदस्य आणि निवडणूक लढवू इच्छिणाºया उमेदवारांनी आपआपल्या जि.प.क्षेत्रात जनसंर्पक वाढविण्यावर भर दिला आहे. सध्या गावांगावामध्ये मंडई उत्सव सुरू असून या माध्यमातून ईच्छुकांनी मतदारांसह संर्पक साधण्यास सुरूवात केली असल्याचे चित्र आहे.दिग्गज उतरणार मैदानातजि.प.चे अध्यक्षपद हे सोडतीत खुले झाले असल्याने सर्वच प्रवर्गाच्या उमेदवारांना अध्यक्षपदी आरुढ होता येणारआहे. त्यामुळे जि.प.च्या निवडणुकीत अनेक दिग्गज उमेदवारांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे.त्यासाठी काहींनी तयारी सुध्दा केली आहे.सर्व राजकीय पक्ष लागले तयारीलाअलीकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्ष सहा महिन्यांनी होऊ घातलेली जि.प.ची निवडणूक लक्षात घेऊन त्यादृष्टीने कामाला सुरूवात केली आहे.निवडणूक लढवू इच्छिणाºया उमेदवारांची चाचपणी आणि जि.प.आणि पं.स.क्षेत्रनिहाय बैठका घेण्यास राजकीय पक्षांनी सुरूवात केली आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद