Gondia: भरधाव ट्रक शेतात उलटला, दोन जण गंभीर 

By अंकुश गुंडावार | Published: April 10, 2024 11:38 AM2024-04-10T11:38:14+5:302024-04-10T11:38:25+5:30

Gondia Accident News : वडसा कोहमारा राज्यमार्ग २७५ वर बुधवारी सकाळी हेटी खामखुरा गावानजीक एक भरधाव मालवाहू ट्रक रस्त्यालगतच्या शेतात उलटला. यात दोन जण जखमी झाले. ही घटना आज सकाळी घडली. 

Gondia: Rushing truck overturns in field, two critical | Gondia: भरधाव ट्रक शेतात उलटला, दोन जण गंभीर 

Gondia: भरधाव ट्रक शेतात उलटला, दोन जण गंभीर 

- अंकुश गुंडावार  
अर्जुनी मोरगाव (गोंदिया ) - वडसा कोहमारा राज्यमार्ग २७५ वर बुधवारी सकाळी हेटी खामखुरा गावानजीक एक भरधाव मालवाहू ट्रक रस्त्यालगतच्या शेतात उलटला. यात दोन जण जखमी झाले. ही घटना आज सकाळी घडली. 

ट्रक मध्ये फसलेल्या एका इसमाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्याला अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे हलविण्यात आले. ट्रकमधील साहित्याच्या खाली आणखी एक इसम दबून असल्याची माहिती आहे. अपघात नेमका कसा झाला हे कळले नसले तरी टायर पंचर होऊन ट्रक अनियंत्रित झाल्याने शेतात उलटल्याची चर्चा आहे.

Web Title: Gondia: Rushing truck overturns in field, two critical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात