शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 05:00 AM2020-01-21T05:00:00+5:302020-01-21T05:00:08+5:30

टॉवरसाठी शेतकऱ्यांची जागा जात असल्याने त्यांना रेल्वे आणि महापारेषणतर्फे योग्य मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र रेल्वे विभागाने ठरल्याप्रमाणे मोबदला न देता अल्प मोबदला देऊन पोलीस विभागातंर्गत नोटीस दिली जात आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवून त्यांना जमिनीचा योग्य मोबदला देण्यात यावा असे निर्देश आढावा बैठकीत अधिकाºयांना आ.विजय रहांगडाले यांनी दिले.

Give the farmers proper compensation for their land | शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला द्या

शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला द्या

Next
ठळक मुद्देविजय रहांगडाले : आढावा बैठकीत दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या शेतातून महापारेषण कंपनीची टॉवर लाईन गेली आहे. टॉवरसाठी शेतकऱ्यांची जागा जात असल्याने त्यांना रेल्वे आणि महापारेषणतर्फे योग्य मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र रेल्वे विभागाने ठरल्याप्रमाणे मोबदला न देता अल्प मोबदला देऊन पोलीस विभागातंर्गत नोटीस दिली जात आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवून त्यांना जमिनीचा योग्य मोबदला देण्यात यावा असे निर्देश आढावा बैठकीत अधिकाºयांना आ.विजय रहांगडाले यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, माजी जि.प.उपाध्यक्ष मदन पटले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पवार, तहसीलदार प्रशांत घोरुडे, तहसीलदार शेखर पुनसे,रेल्वे व महापारेषण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.कलपाथरी मध्यम प्रकल्पाचे पुनर्वसन न.प.गोरेगाव येथील कृषक जमिनीवर करुन त्याला गावठाण म्हणून घोषीत करण्यात आले. त्या प्रपत्रानुसार गावठाण जमीन घोषीत करण्यात आलेल्या जमिनीची आखीव पत्रिका (एनए) तयार करावयाचे होते. परंतु अद्यापही आखिव पत्रिका तयार करण्यात आलेल्या नाही. सन २०१७ मध्ये पासून सदर प्रकरण प्रलंबित आहे.गोरेगाव येथील तहसीलदारांनी भूमी अभिलेख विभागाशी संपर्क साधून त्वरीत कार्यवाही करावी असे निर्देश रहांगडाले यांनी दिले. पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत तिरोडा विभानसभा क्षेत्रातील सगळ्यात जास्त प्रमाणात शेतकऱ्यांचे खाते सहकारी बँकेत आहे. या बँकेतील खातेदारांना अद्यापही या योजनेचा लाभ मिळालेला नाही. तर ऑनलाईन यादीमध्ये जवळपास ८० टक्के लाभार्थी दाखवीत आहे. याविषयी मोठ्या प्रमाणात शेतकºयांच्या तक्रारी प्राप्त होतात. यावर जिल्हाधिकारी यांनी आठ दिवसाच्या आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीचे पैसे जमा झाले नाहीत त्यांचे आधारकार्डवर असलेले नाव अद्यावत करण्याचे आदेश दिले. महात्मा फुले वार्ड नं. प. तिरोडा येथे अतिक्रमणधारकांना पट्टे मिळण्याबाबत त्वरीत कार्यवाही करण्यात यावी. जेणेकरुन त्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ देता येईल. मौजा बेरडीपार (काचे.) येथे लोहझरी तलावाकरीता लघु पाटबंधारे तलाव शासनातर्फे मंजूर करण्यात आला आहे.
या तलाव बांधकामाकरीता रामपुरी, बरबसपुरा, बेरडीपार, नहरटोला येथील शेतकऱ्यांनी जमिनी शासनाकडे हस्तांतरीत केल्या होत्या. परंतु तांत्रिक अडचणीमुळे सदर तलावाचे काम शासनातर्फे रद्द करण्यात आले. आजही या शेतकऱ्यांच्या सात बाऱ्यांवर तलाव अधिग्रहण नोंद असे नमूद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जमीन खरेदी विक्री करण्याकरीता अडचण निर्माण होत आहेत. सदर प्रकरण मार्गी लावण्याकरीता शासनाकडे त्वरीत अहवाल पाठविण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आ. विजय रहांगडाले यांनी दिले.

Web Title: Give the farmers proper compensation for their land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.