शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
3
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
4
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
5
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
6
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
7
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
8
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
9
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
10
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
11
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
12
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
13
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
14
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
15
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
16
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
17
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
18
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
19
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
20
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
Daily Top 2Weekly Top 5

गोरेगाव तालुका कृषी क्षेत्रात होणार ‘हायटेक’

By admin | Updated: June 14, 2014 23:41 IST

आसमानी संकट, अतिवृष्टी, निविष्ठा व मजुरांचे वाढीव दर या समस्यांवर मात करीत येथील शंभराच्यावर शेतकऱ्यांनी फळबाग व भाजीपाल्याच्या शेतीला अधिक पसंती दिली आहे. तालुक्यातील ही फळबाग शेती

पारंपरिक शेतीला बगल : शेतकरी वळले नगदी पिकाकडे
दिलीप चव्हाण - गोरेगाव
आसमानी संकट, अतिवृष्टी, निविष्ठा व मजुरांचे वाढीव दर या समस्यांवर मात करीत येथील शंभराच्यावर शेतकऱ्यांनी फळबाग व भाजीपाल्याच्या शेतीला अधिक पसंती दिली आहे. तालुक्यातील ही फळबाग शेती आधुनिक पद्धतीने घेतली जात असून गोरेगाव तालुक्याची कृषी क्षेत्रात ‘हायटेक’ होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू झाली आहे.
या भागातील शेतकरी पिठ्यान्पिठ्या धान शेती करीत आहे. मात्र या शेतीत शेतकऱ्यांना हवे तेवढे उत्पन्न मिळत नाही. बहुतेक वेळा लागवड खर्चही निघणे कठिण होते. यावर मात करण्यासाठी शेतकरी फळबाग शेतीकडे वळत आहेत. या शेतीतून शेतकऱ्यांना लाखोच्या घरात कमाई होण्याची आशा निर्माण झाली आहे.
तालुक्यातील बबई येथील अभियंता रवी बघेले यांनी आपल्या शेतात चार एकरमध्ये काकडीची शेती लावली आहे. या काकडीच्या शेतीतून बघेले यांना महिन्याकाठी ८० हजारांचा फायदा होतो. दरदिवशी बघेले गोंदियाच्या बाजारपेठेत काकडी विकायला पाठवितात. प्रत्येक दिवशी २० ते ५० क्विंटल काकडी निघते. डव्वा येथील शिवा बघेले या तरुण शेतकऱ्याने आपल्या तीन एकर शेतीमध्ये हंगामानुसार बागायती शेतीला प्राधान्य दिले आहे. त्यांनी तीन एकरात, काकडी, लवकी, कारले, कोहळा, चवळीच्या शेंगा इत्यादी भाजीपाल्याचे उत्पादन केले आहे. या उत्पादनातून लाखो रुपये कमविले.
कटंगी येथील फणिंद्र हरिणखेडे यांनी दोन एकरमध्ये फळबाग लागवड केली आहे.
गोरेगाव येथील सुरेंद्र दिनदयाल पटले, दिनदयाल छगनलाल पटले यांनी ५ एकरमध्ये काकडीचे पिक लावले आहे. मसगाव येथील बोपचे, पटले, झांजीया येथे श्रीराम अग्रवाल, पलखेडा येथील आलोक सोलंकी, सुरेंद्र सोलंकी, मोहगाव बुज. येथील मुक्ता केवाडे यांनी अडीच एकरात पपई तर अडीच एकरात भाजीपाला लावला आहे.
तिमेझरी येथील पटले यांनी आपल्या तीन एकर शेतीमध्ये पपईची लागवड केली आहे. यातून पटले यांना लाखोंचे उत्पादन मिळाले आहे. गोरेगाव येथील डॉ. रुस्तम येडे यांनी आपल्या पाच एकरात भेंडी, गवार, चवळीच्या शेंगा, वांगी, कोबी, कारले, काकडी इत्यादीचे उत्पादन घेवून शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे.
या शेतकऱ्यांना ‘हायटेक’ शेतीकडे वळविण्यासाठी तालुका कृषी कार्यालयाकडून विशेष मोहीम राबविली जात आहे. तालुक्यातील सोनेगाव, भंडगा, पालेवाडा, कटंगी, मोहगाव, म्हसगाव या गावात शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरेल असे नाविन्यपूर्ण भाजीपाला प्रक्षेत्र तयार करून रोजगाराच्या संधी कृषी विभागाच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत.
महाराष्ट्र स्पर्धात्मक शेती प्रकल्पांतर्गत अनुदानावर शेतकऱ्यांना भाजीपाला वाहून नेणारी ट्रॉली व भाजीपाला कॅरेट्स शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले असून शेतकरी त्याचा लाभ घेताना दिसत आहे.
शहरी भागाकरिता भाजीपाला विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्यात आले आहे. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात तालुक्यात भाजीपाला उत्पादकांचे गट निर्माण करणे, जाळे तयार करणे, ठिबक सिंचन, प्लास्टिकल्चर इत्यादी सोयी अनुदान तत्वावर उपलब्ध करून देणे या बाबीवर विशेष भर दिला जात आहे.
तालुक्यात ‘आत्मा’ योजनेचा लाभ घ्यावा यासाठी सभेमध्ये दिशादर्शक माहिती देवून कृषी क्षेत्रात गोरेगाव तालुक्याला वेगळ्या दिशेने नेण्यासाठी कृषी अधिकारी मंगेश वावधने परिश्रम घेत आहेत.