शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

लाईफ लाईनला दीड हजार रूग्णांची भेट

By admin | Updated: May 16, 2016 01:57 IST

आरोग्य सेवा देण्यासाठी शहरात आलेल्या लाईफ लाईन एक्स्प्रेसला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत आहे.

उन्हातही प्रतिसाद : १७ पासून कान व दातांची नोंदणीगोंदिया : आरोग्य सेवा देण्यासाठी शहरात आलेल्या लाईफ लाईन एक्स्प्रेसला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत आहे. रखरखत्या उन्हातही रूग्ण उपचार करवून घेण्यासाठी येत असून यातूनच आतापर्यंत दीड हजार रूग्णांनी एक्स्प्रेसला भेट दिली आहे. येत्या २५ मेपर्यंत लाईफ लाईन एक्स्प्रेस येथे राहणार आहे. गोंदियात आलेल्या लाईफ लाईन एक्स्प्रेसमध्ये मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करण्यासाठी १२०९ लोकांनी नोंदणी केली होती. त्यानुसार १९३ लोकांची मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. ९० मिरगीच्या रूग्णांची तपासणी करून त्यांना सल्ला देण्यात आला. अपंगाच्या ११९ नोंदणी झाल्या असून ओष्ठव्यंग असलेल्या १८ ची तर हाड तुटलेल्या, वाकलेल्या १८ लोकांची शस्त्रक्रियेसाठी निवड झाली आहे. सोयीनुसार अपंगांना कॅलिपर्स वाटप करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक प्रकारच्या रूग्णांसाठी बाहेरील तज्ज्ञ डॉक्टरांची चमू आलेली आहे. कानाच्या पडद्याच्या शस्त्रक्रिया व दातांची तपासणी करण्यासाठी १७ मे पासून नोंदणी करण्यात येणार आहे. नोंदणी व शस्त्रक्रिया २५ मेपर्यंत करण्यात येणार आहे. ओष्ठव्यंगाच्या शस्त्रक्रियेसाठी लखनऊ येथील पाच डॉक्टरांची चमू, मिरगीसाठी मुंबई येथील डॉक्टर व डोळ्यासाठी डॉ. धर्मेंद्रसिंग आले आहेत. कानाच्या रूग्णांची तपासणी केल्यानंतर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कानाची मशीनही रूग्णांना दिली जाणार आहे. दातांच्या रूग्णांची तपासणी करून रूग्णांच्या गरजेनुसार दातांमध्ये सिमेंट भरणे, स्केलिंग करणे, दात उपटण्याचे काम केले याणार आहे.