शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
3
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
4
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
5
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
6
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
7
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
8
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
9
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
10
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
13
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
14
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
15
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
16
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
17
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
18
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
19
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
20
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

थंडीने गारठला जिल्हा

By admin | Updated: December 26, 2015 01:53 IST

मागील पाच-सहा दिवसांपासून थंड वाऱ्यामुळे जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. वातावरणात गारवा वाढल्याने तापमान १० अंशांवर घसरले आहे.

पारा १० अंशांवर: पाच दिवसांपासून तीव्रता वाढलीगोंदिया : मागील पाच-सहा दिवसांपासून थंड वाऱ्यामुळे जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. वातावरणात गारवा वाढल्याने तापमान १० अंशांवर घसरले आहे. त्यामुळे एकीकडे गरम कपड्यांची विक्री वाढली आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात शेकोट्या पेटवून ऊब मिळवून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.गेल्या काही दिवसांपासून वातावरणात गारवा जाणवू लागला आहे. पाच ते सहा दिवसांपासून सकाळी थंडीची लाट वाढल्याचे समजून येते. या थंडीची हुडहुडी आता दिवसभर कमी-अधिक प्रमाणात कायम राहते. मागील तीन ते चार वर्षापासून परिसरात दुष्काळाचे चित्र दिसून येत आहे. मागील वर्षी हिवाळ्याच्या आठ-दहा दिवस कमीअधिक प्रमाणात थंडी जाणवली, मात्र नंतर हा ऋतूच जाणवला नाही. सध्याचे वर्ष तर मागील वर्षापेक्षा अधिक तीव्र दुष्काळी आहे. पाऊसही खूपच कमी पडला. परतीचा मान्सूनचा तर पत्ताच नाही. या भागात परतीचा पाऊस पडला नसला तरी शेजारच्या राज्यात कहर केला. उत्तरेकडे बर्फवृष्टी झाली आणि तेथील थंडीची झुळूक येथपर्यंत आली. मागील १५ दिवसांपासून अंगाला गारवा जाणवू लागला होता. पण मागील पाच ते सहा दिवसांपासून त्याची तीव्रता अधिक वाढली आहे. पहाटे व सकाळी गरम कपडे घालून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. पहाटे तर बोचणारी व अंगाला झोंबणारी थंडी जाणवते. त्यामुळे दुष्काळात थंडीची चाहूल हवीहवीशी वाटणारी ठरली आहे. सामान्य माणूस थंडीचा अनुभव घेवू लागला आहे. सकाळचा गारवा अनुभवला जात आहे. विशेष म्हणजे थंडी जाणवू लागली तरी हिवाळ्यातील पहाटेचे दवबिंदू कुठेच दिसत नाही. वातावरणातील आर्द्रताच कमी झाल्याचा हा परिणाम आहे. दवबिंदू नसल्याने कोरड्या थंडीचा चटका जाणवत आहे. त्यात पहाटे व सकाळच्या वाऱ्याने भर घातल्यामुळे थंडीची तीव्रता वाढली आहे. आता ग्रामीण परिसरात शेकोट्या पेटवून गरमी मिळविण्यासाठी एकत्र आलेली मंडळी, असे चित्र दिसून येत आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात ही तीव्रता अधिक आहे. सकाळी व दिवस मावळल्यानंतर सायंकाळी गारवा जाणवू लागला आहे. (प्रतिनिधी)