शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रविप्रसादचा खून करणाऱ्या चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:25 IST

गोंदिया : रेतीची तुटलेली पार्टनरशिप आणि रखडलेल्या आर्थिक व्यवहारामुळे शहरातील रिंगरोडवरील सहयोग हॉस्पिटल परिसरात धारदार शस्त्राने वार करून रविप्रसाद ...

गोंदिया : रेतीची तुटलेली पार्टनरशिप आणि रखडलेल्या आर्थिक व्यवहारामुळे शहरातील रिंगरोडवरील सहयोग हॉस्पिटल परिसरात धारदार शस्त्राने वार करून रविप्रसाद राधेलाल बंभारे (३५, रा. लोधीटोला) याचा गुरुवारी (दि. १४) रात्री खून करण्यात आला. या प्रकरणातील चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

आरोपींमध्ये श्याम उर्फ पी. टी. चाचेरे, शुभम परदेशी, प्रशांत भालेराव ऊर्फ कालू मातादिन व शाहरुख शेख या चौघांना शनिवारी (दि. १६) पहाटे ३ वाजता अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ क्रमांक एमएच १४-वाय ७७७७ हे वाहन जप्त करण्यात आले नाही. मृत रविप्रसाद बंभारे याने आरोपी श्याम ऊर्फ पी.टी. चाचेरे सोबत रेती व्यवसायाची पार्टनरशिप केली होती. परंतु पैशांमुळ दोघांत झालेल्या मतभेदांमुळे नोव्हेंबर महिन्यात ही पार्टनरशिप तुटली होती. तेव्हापासून रविप्रसाद हा एकटाच रेतीचा व्यवसाय करीत होता. यामुळे चाचेरे याने त्याला ठार करण्याचा कट रचला होता. घटनेच्या ४ दिवसांपूर्वी चाचेरे याने मृत रविप्रसादला फोन करून ठार करण्याची धमकी दिली होती. त्याचा वचपा गुरुवारी (दि. १४) रात्री १० वाजताच्या सुमारास काढण्यात आला. रविप्रसादच्या पोटावर तलवार, गुप्ती, चाकूने १५ ते २० घाव करून त्याचा खून करण्यात आला. रामनगर पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास ठाणेदार प्रमोद घोंगे करीत आहेत.