शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
4
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
5
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
6
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
7
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
8
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
9
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
10
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
11
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
12
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
13
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
14
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
15
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
16
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
17
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
18
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
19
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या नावाखाली साडेतीन लाखांनी फसवणूक

By admin | Updated: November 12, 2014 22:45 IST

बँक आॅफ इंडियामध्ये परिचर म्हणून नोकरी देण्याच्या नावावर साडेतीन लाखांनी फसवणूक करणाऱ्या मुंबई येथील रेल्वे अधिकारी अमर पंधरे याच्याविरोधात देवरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

देवरी : बँक आॅफ इंडियामध्ये परिचर म्हणून नोकरी देण्याच्या नावावर साडेतीन लाखांनी फसवणूक करणाऱ्या मुंबई येथील रेल्वे अधिकारी अमर पंधरे याच्याविरोधात देवरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.प्राप्त माहितीनुसार मिलिंद नरेश साखरे, रा.तुकुमनगर (मोरगाव/ अर्जुनी) यांना मुंबई येथील रेल्वे विभागात उच्चपदावर कार्यरत असलेले अमर शालीकराम पंधरे रा. मकरधोकडा, ता.देवरी यांनी बँक आॅफ इंडियात परिचरपदावर नोकरीवर लावून देण्याचे आमिष दाखविले. त्यातून साखरे यांच्याकडून जुलै २०१४ मध्ये साडेतीन लाख रुपये घेतले. परंतु साखरे यांना नोकरी मिळाली नाही. त्यांना आपली फसवणुक झाल्याचे स्पष्ट होताच त्यांनी अमर कुंभरेला पैसे परत मागण्याकरिता वारंवार दुरध्वनीवरुन संपर्क केला. परंतु त्यांनी पैसे परत केले नाही. साखरे यांनी ५० हजार रूपये व्याजाने घेतले होते. ५० हजार रूपये शेतीवर कर्ज घेतले. आपल्या भावाकडून एक लाख रूपये उसनवारीवर घेतले होते. आईचे दागिने विकून ९७ हजार गोळा केले होते. ते पैसे अमर पंधरे याच्या बँक आॅफ इंडियाच्या खात्यात ९४ हजार, २० मार्च ला ६ हजार, ६ एप्रिलला एक लाख २५ हजार, ६ मे ला ३५ हजार व ३ मे ला देवरीच्या राधीका हॉटेलात एक लाख ४० हजार रूपये रोख दिल्याचे त्याने तक्रारीत म्हटले आहे. मिलिंद साखरे यांनी ११ नोव्हेंबरला अमर पंधरे व त्याचे सहकारी रंजन टेंभुर्णीकर रा. परसटोला यांच्याविरोधात देवरी पोलीसात तक्रार केली. देवरी पोलिसांनी अमर पंधरे व रंजन टेंभुर्णीकर यांच्या विरोधात भादंवि कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ४७३, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार औटी व त्यांचे सहकारी करीत आहेत. (प्रतिनिधी)