शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिन्यात समन्वयातून सुटले ४६११ तंटे

By admin | Updated: July 9, 2014 23:35 IST

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील ५५६ समित्यांनी सन २०१४ च्या पाच महिन्यात ६९७२ तंटे दाखल करून त्यापैकी ४६११ तंटे सामोपचाराने सोडविले आहेत.

गोंदिया : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील ५५६ समित्यांनी सन २०१४ च्या पाच महिन्यात ६९७२ तंटे दाखल करून त्यापैकी ४६११ तंटे सामोपचाराने सोडविले आहेत.
राज्य शासनाने गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडविण्यासाठी तंटामुक्त गाव मोहीम अंमलात आणली. या मोहिमेंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील हजार तंटे सामोपचाराने सोडविण्यात आले. तंटामुक्त मोहीम आल्यापासून ग्रामीण भागातील अनेक नागरिक आपले भांडण, तंटे गावातच सोडवितात. अनेक लोक ही मोहीम आल्यापासून पोलीस ठाणे किंवा न्यायालयाची पायरी चढत नाही. गावात शांतता नांदावी, नवीन तंटे उद्भवू नये यासाठी तंटामुक्त समिती अविरत प्रयत्न करीत आहे. तंटामुक्त समितीने प्रयत्न केल्यावरही भांडण, तंटे तर ते तंटे गावातल्या गावात सामोपचाराने सोडविले जातात. याचाच परिणाम गोंदिया जिल्हा तंटामुक्त होऊन तीन वर्षाचा काळ लोटूनही मोहीम राबविणाऱ्या समित्यांनी तंटे सोडविण्याची गती सुरूच ठेवली आहे. २०१४ च्या पाच महिन्यात दिवाणी, महसूल, फौजदारी व इतर अशा स्वरूपाचे तंटे दाखल करून गावगाड्यातून तंट्याचा निपटारा करण्यात आला. दिवाणी स्वरूपाचे चार तंटे दाखल करून एक तंट्याचा निपटारा करण्यात आला आहे. महसूली स्वरूपाची ६ तंटे दाखल करून २ तंट्याचा निपटारा करण्यात आला आहे. फौजदारी स्वरूपाची ६९६१ तंटे दाखल करून ४ हजार ६०८ तंट्याचा निपटारा करण्यात आला आहे. इतर स्वरूपाचा एक तंटा दाखल करण्यात आला मात्र त्या तंट्याचा निपटारा करण्यात आला नाही.
मागील पाच महिन्याच्या काळात जिल्ह्यातील ५५६ समित्यांनी ६ हजार ९७२ तंटे दाखल करून ४ हजार ६११ तंटे समन्वयातून सोडविण्यात आले. शांततेत तंटे सोडवून गावात शांततेतून समृध्दी आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.(तालुका प्रतिनिधी)