शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

कालव्यात शेतकऱ्यांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 06:00 IST

रब्बी हंगामाच्या धानपिकाला इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापनाने सिंचन उपलब्ध करु न द्यावे अशी शेतकऱ्यांची मागणी होती. दोन ते तीनदा शेतकरी व अधिकाऱ्यांच्या यासंदर्भात बैठका झाल्या. लागवड क्षेत्रातील सर्व लाभधारकांना सिंचन उपलब्ध करून देण्याचा निश्चय झाला. मात्र मोटार पंपधारकांना यातून वगळण्याचा निर्णय झाला.

ठळक मुद्देप्रशासनाविरु द्ध रणशिंग फुंकले । अधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : मोटारपंपधारक शेतकºयांना रब्बी हंगामाच्या धानपिकाला सिंचनाचे पाणी उपलब्ध व्हावे या मागणीसाठी इटियाडोह धरणाच्या ताडगाव मुख्य कालव्यात शनिवारपासून (दि.४) शेतकरी आमरण उपोषणाला बसले आहेत.इटियाडोह धरण हे येथील शेतकऱ्यांच्या हरितक्र ांतीचे स्वप्न साकारणारे प्रकल्प आहे. या धरणाच्या पाण्यामुळे गोंदिया, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यातील शेतीला सिंचन होते. उन्हाळी धानपिकासाठी गोठणगाव, अर्जुनी, वडेगाव, कोरंभी, लाखांदूर, बारव्हा, वडसा, कोंढाळा, आरमोरी शाखेतील १० हजार हेक्टर शेतजमिनीला सिंचन देण्याचे नियोजित आहे. गत सहा वर्षांनंतर यावर्षी इटियाडोह धरण ओव्हरफ्लो झाले. सध्या धरणात २९६ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. रब्बी हंगामाच्या धानपिकाला इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापनाने सिंचन उपलब्ध करु न द्यावे अशी शेतकऱ्यांची मागणी होती. दोन ते तीनदा शेतकरी व अधिकाऱ्यांच्या यासंदर्भात बैठका झाल्या. लागवड क्षेत्रातील सर्व लाभधारकांना सिंचन उपलब्ध करून देण्याचा निश्चय झाला. मात्र मोटार पंपधारकांना यातून वगळण्याचा निर्णय झाला. यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली होती. गेल्या महिनाभरापासून शेतकऱ्यांत आक्रोश होता. यामुळे सर्व पंपधारक एकत्र आले. ते जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा भेटले. मात्र सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. शनिवारी (दि.४) सकाळी ताडगाव कालव्यात शेकडो शेतकरी एकत्र आले. त्यांनी ३ किमी. पदयात्रा काढत पाटबंधारे उपविभाग गाठले. उप विभागीय अभियंता भिवगडे यांना निवेदन दिले. त्यानंतर त्यांनी उप विभागीय दंडाधिकारी शिल्पा सोनाळे यांना निवेदन दिले. लगेच तहसीलदारांकडे मोर्चा वळविला व नायब तहसीलदार मुनेश्वर गेडाम यांना निवेदन दिले. त्यानंतर ही पदयात्रा ताडगाव कालव्यावर पोहोचली व तिथे दुपारी १ वाजताच्या सुमारास उपोषणाला बसले. उपोषण मंडपाला माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी भेट दिली.वरिष्ठांना प्रस्ताव पाठविणारपंपधारक शेतकरी सिंचनासाठी अत्यंत आग्रही आहेत. त्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार सुरू आहे. आपल्या सहकाऱ्यांना बोलावून त्यांचे नियोजन करणे सुरू आहे. हा प्रस्ताव वरिष्ठांना सादर करणार आहे. त्यांची संमती मिळाल्यानंतर पंपधारकांना सिंचन सुविधा पुरविली जाईल. यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन उप विभागीय अभियंता भिवगडे यांनी केले.अटींचे पालन करावेमंजूर क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रात पेरणी करू नये.रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी अधिकाधिक १ हेक्टरपर्यंत पीक लागवड करावीवर्षानुवर्षे थकीत असलेल्या पाणसाऱ्यांचा १०० टक्के भरणा करावा.परवानगी क्षेत्राव्यतिरिक्त अधिक क्षेत्र भिजवू नये. स्वत: पाणी विकून इतर शेतकऱ्यांना देऊ नये. ४प्रत्येक पाळीत ४ दिवस पाणी घेण्याची ठराविक वेळेत मुभा राहील.उपोषणकर्त्यांच्या या आहेत मागण्याचालू हंगामाकरिता सर्व पंपधारकांना पाणी मिळावे, हक्क असलेल्यांना प्रवाह पद्धतीप्रमाणे मोटार पंपधारकांना सामावून घ्यावे, मुख्य कालव्यात शेती गेलेल्या लाभधारकांना प्रकल्पग्रस्तांचे दाखले द्यावे, पानसारा करावरील व्याजमुक्त करावे, ९५ टक्के जलसाठा उपलब्ध असल्याने पाणी द्यावे या मागण्यांसाठी शेतकरी उपोषणावर बसले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी