शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

हसारा येथे शेतकऱ्याने केली फुलांची शेती

By admin | Updated: March 30, 2016 02:03 IST

नगदी पीक घेण्याकरिता हातात पैसा नाही. धान शेती तोट्याची आहे. रब्बी पिकांनंतर प्रायोगिक तत्वावर केवळ २५ डिसमिल शेतात फुलांची शेती करण्याला सुरुवात

बाजारात केवळ ११ रुपये किलोचा भाव : प्रायोगिक तत्त्वाची शेती तोट्यातगोंदिया : नगदी पीक घेण्याकरिता हातात पैसा नाही. धान शेती तोट्याची आहे. रब्बी पिकांनंतर प्रायोगिक तत्वावर केवळ २५ डिसमिल शेतात फुलांची शेती करण्याला सुरुवात भंडारा जिल्ह्यातील हसारा येथील एका शेतकऱ्याने केली. परंतु फुलांचे व्यापारी किंमत कमी देत असल्याने या शेतकऱ्याच्या पदरी निराशा पडली आहे. हसारा येथील रामपाल राऊत यांची तुसमर तालुक्यात हसारा-हिंगणा रस्त्यावर शेती आहे. यावर्षी धानचे पीक हातून गेले. शेतात विहीर व मोटारपंप असल्याने आपण ही प्रायोगिक तत्वावर फुलांची शेती करावी असे रामपाल यांना वाटले. केवळ २५ डिसमिल शेतात (एका बांधीत) झेंडू व अन्य जातीच्या फुलांची शेती रामपाल यांनी लावली. फुलांची शेती केवळ ३ ते ४ महिने इतकीच असते. एका आठवड्यातून तीन ते चारदा फुल तोडून बाजारात रामपाल विक्री करीता नेतात. सध्या फुल विक्रेते केवळ ११ रुपये प्रती किलोग्रॅमचा भाव देत आहेत. फुल विक्रेत्यांकडून सर्वसामान्य ग्राहक गेला तर ८० रुपये प्रति किलोग्रॅम विक्री करतात. त्यामुळे रामपाल यांची निराशा झाली. फुलांच्या शेतीचा खर्च, देखरेख, उन्हाळ्यात फुल शेतीला पाणी देणे, फुल तोडीचा खर्च वजा जाता काहीच मिळत नाही. असे रामपाल यांनी सांगितले. शासनाकडून काहीच मदत या शेतीला मिळत नाही. कुणी कृषी अधिकारी सुद्धा भेट देत नाही. एक मात्र खरे उन्हाळ्यात या रस्त्यावरून जाणाऱ्यांचे लक्ष मात्र ही फुल नक्कीच खेचून घेतात. या फुल शेतीला शासनाने मदत करण्याची गरज आहे.