शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
3
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
4
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
5
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
6
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
7
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
8
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
9
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
10
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
11
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
12
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
13
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
14
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
15
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
16
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
17
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
18
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
19
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
20
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
Daily Top 2Weekly Top 5

शेती करण्यास शेतकरी उदासीन; खर्चच अधिक

By admin | Updated: June 13, 2014 00:18 IST

भारत कृषिप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून आहे. आज कृषीवर आधारित असणारे शेतकरी शेती करायला तयार नाहीत. शेती राबताना खर्च अधिक आणि धानाला कमी भाव मिळत

काचेवानी : भारत कृषिप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून आहे. आज कृषीवर आधारित असणारे शेतकरी शेती करायला तयार नाहीत. शेती राबताना खर्च अधिक आणि धानाला कमी भाव मिळत असल्याने शेती करण्यास शेतकरी
विचार करित आहे. भाड्याने लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना परवडत नाही. शेतीत गुंतवलेले पैसे निघत नसल्याने शेती करायला शेतकरी धजावत नसल्याचे दिसून येत आहे.


शेतीचे दिवस मे महिन्याच्या १५ तारखेला सुरू होतात. रोहिणी नक्षत्र लागले की शेतकऱ्यांना शेतीची चिंता भोवते. मृग लागताच पेरणीची लगबग सुरू होते. शेतीचे दिवस आले की शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत होता. पण आता शेतकऱ्यांचे मन शेतीवरून उडत चालले आहे. शेतकऱ्यांचा उत्साह मागील पाच वर्षांत पूर्णत: नष्ट झाला आहे. नैसर्गिक संकटे, खताच्या वाढलेल्या किमती, औषधीच्या किमती, रोग व किडींचा प्रादुर्भाव, धानाच्या घसरत्या किमती, मजुरांची समस्या, मजुरीत झालेली बेसुमार वाढ या सर्व कारणांनी शेतकरी शेती करण्यात मागे-पुढे पाहात आहेत.


भाड्याने शेती करणाऱ्याला शेती करणे परवडण्यासारखी राहिली नाही. एका एकराला भाड्याने शेती करण्याकरिता सुरूवातीपासून धान घरी येईपर्यंत १२ ते १४ हजार रुपये खर्च येतो. काही तालुके वगळता गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील तिरोडा, गोंदिया, गोरेगाव, तुमसर, मोहाळी या तालुक्यातील शेतकऱ्यांना १२ क्विंटलच्या वर उत्पन्न होत नाही. धानाला ७०० ते हजार रुपये किंमत असल्याने लागणारा खर्च आणि उत्पन्नातील किंमत पाहता शेतकरी शेती करील का? ही वास्तव असून एकरी दोन ते तीन हजाराचे नुकसान सहन करावे लागत आहे. निसर्गाने साथ दिली तर बरे, नाही तर संकटच आहे. घरी शेती करणाऱ्याला नांगरणी खर्च, काही प्रमाणात मजुरी खर्च, मळणी खर्च येत नसल्याने येणाऱ्या खर्चातून २५ टक्के फायदा मिळतो. एकरी येणाऱ्या १२ ते १४ हजाराच्या खर्चातून पाच हजार कमी केले तर यांना दोन ते पाच हजार फायदा मिळतो. पण मेपासून फेबु्रवारी, मार्च या आठ महिन्यांच्या मेहनतीतून दोन ते पाच हजार रुपये फायद्याला किती अर्थ आहे? शेतकऱ्यांचे संपूर्ण कुटूंब शेतीमध्ये जुंपल्या जाते. याचा विचार केल्यास शेतकऱ्यास महिन्याला ३०० रुपयेसुद्धा पडत नाही. तरीपण शेतकरी नाईलाजास्तव शेती करीत आहे. दोन वर्षांपासून शेतकरी नैसर्गिक आपत्तीच्या तावडीत सापडला. कधी अवकाळी पाऊस तर कधी पाण्याच्या अभावाने दुष्काळ परिस्थती. अशा वेळी शासन आणि लोकप्रतिनिधी पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना कितीतरी आश्वासने देतात. पण किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला हे शेतकऱ्यांना आणि देणाऱ्या शासनालाच माहीत आहे.


शेतकऱ्यांना आस लावून ठेवण्यात आली. लाभ मात्र देण्यात आला नाही. सरकार किती देणार? नुकसान होते एकरी १० हजार रुपयांचे आणि मदत मिळते एक हजार रुपये. हे रडत्याचे अश्रू पुसण्यासारखे आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत. एकंदरीत शेतकऱ्यांना शेती करणे परवडत नाही. (वार्ताहर)