शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

अड्याळ परिसरात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच

By admin | Updated: December 26, 2015 02:02 IST

‘इतकेच मला जाताना, सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते..’ या सुरेश भटांच्या ओवी फार काही सांगून जातात.

उपाययोजनांची गरज : आश्वासनांनी आत्महत्या थांबणार काय?अड्याळ : ‘इतकेच मला जाताना, सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते..’ या सुरेश भटांच्या ओवी फार काही सांगून जातात. आत्महत्या केल्यानंतर सरणावर शेवटची आपल्या स्वकियांना, आप्तांना भेट देणारा शेतकरी जणू हेच बोलून जात असणार. नैसर्गिक संकटांबाबत आपण काहीच करू शकत नाही. परंतु त्यातून सावरायला उपाययोजना असतात. मात्र या परिसरात केवळ आश्वासनांपलिकडे काहीही मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत.आपले दु:ख खांद्यावर घेवून सरणावर चढणारा शेतकरी, कर्जबाजारी होणारा शेतकरी हा या दशकातील महत्वाचा विषय ठरत आहे. उत्पन्न व खर्च यांच्यातील प्रमाणामुळे शेती खरोखर फायद्याची आहे काय, हा विषय आता चर्चेचा झाला आहे. नापिकीमुळे आत्महत्याचे प्रसंग अड्याळ व परिसरात पोहचणार नाही असे वाटत असतानाच एका आठवड्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. १७ डिसेंबरला आकोट येथील बाळकृष्ण नागो देशमुख (४८) या शेतकऱ्याने शेशतावर झाडाला गळफास लावून आत्महत्या केली तर १६ डिसेंबरच्या रात्री ३ च्या सुमारास विष प्राशन केले होते व त्यांचे उपचाराअंती २२ डिसेंबरला प्राण गमावले. राजु विठ्ठलराव पोटवार (५३) रा. अड्याळ या दोघांनी वेगवेगळ्या मार्गाने आपले जीव दिले. परंतु शेतात राबणाऱ्या बळीराजाचे बळी घेणारे राजे कोण, बळी जाण्याच्या वाटा आणि वाट्याला येणारे मृत्यु यांना आताच ब्रेक दिला नाही तर दर दिवसाला गावात मोठ्या नेत्यांचे आमगन राहिल आणि शेतकऱ्यांचे स्मशानात निर्गमन याकडे गांभीर्याने उपाय योजना आखण्याची नितांत गरज आहे.ज्या गावातील तालुक्यातील शेतकरी आत्महत्या करीत नाही याचा अर्थ तो कर्जबाजारी नाही, असे घेवून चालणार नाही. या प्रश्नाकडे आता नव्याने पाहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. आत्महत्या होण्यामागील कारणेधान्य बाजारात चाललेली दलालांची मनमानी, बँकेच्या कर्जयोजनेची नव्याने मांडणी, किचकच असणारी विमा पद्धत व जर धान्य शेतीतून शेतकरी सावरणार नसेल तर त्याला अन्य मार्ग उपलब्ध करून देण्याची तयारी आदी सर्व गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज आहे. विशेषत: आणेवारी संदर्भात शेतकरी केव्हा कर्जबाजारी झाला हे किंवा त्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यावर किती कर्ज होते हे विचारण्यापेक्षा तो कर्जबाजारी झालाच कसा याचा विचार होण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणा, नापिकीमुळे, सिंचनाअभावी रोगामुळे, आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही यासाठी या सर्वांचे नियंत्रण, नियोजन, प्रबोधन लोकशिक्षण करण्याची जबाबदारी अर्थात कोणावर ज्याच्यावर आहे ते सरकार विषेशत: आताचे युती सरकार शेतकऱ्यांच्या बाजुचे आहे काय, असा प्रश्न शेतकरी व्यक्त करीत आहेत.