शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

२.५ लाखांचा कॅमेरा चोरणाऱ्या प्रसिद्ध पक्षिमित्राला अटक

By admin | Updated: November 4, 2014 22:41 IST

नवेगावबांध या पर्यटनस्थळावरील ‘हॉलिडे होम’ या पर्यटन संकुलातून एका पर्यटकाचा दोन लाख ५० हजार रूपये किमतीचा विदेशी कॅमेरा अडीच वर्षांपूर्वी चोरी गेला होता. मात्र त्याचा छडा

गोंदिया : नवेगावबांध या पर्यटनस्थळावरील ‘हॉलिडे होम’ या पर्यटन संकुलातून एका पर्यटकाचा दोन लाख ५० हजार रूपये किमतीचा विदेशी कॅमेरा अडीच वर्षांपूर्वी चोरी गेला होता. मात्र त्याचा छडा लावण्यात पोलिसांना अद्याप यश आले नव्हते. अखेर तक्रारकर्त्याने व त्यांच्या मित्रांनी संशयित व्यक्तीवर पाळत ठेवून अखेर त्याला साकोली पोलिसांच्या मदतीने पकडण्यात यश मिळविले. या प्रकरणात गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्यात पक्षीमित्र म्हणून प्रसिद्ध असलेला भीमसेन डोंगरवार (४०) रा.धाबेपवनी याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरच्या फ्रेन्ड्स कॉलनीतील रहिवासी डॉ.श्रीकृष्ण बावीसकर हे नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानात पर्यटनासाठी आपल्या काही मित्रांसह अडीच वर्षांपूर्वी आले होते. त्यांच्याजवळ २ लाख ५० हजार रूपये किमतीचा दूरवरील छायाचित्रे टिपणाऱ्या लेन्सचा कॅमेरा होता. ते नवेगावबांध पार्कमधील पर्यटन संकुलात वास्तव्याला होते. नवेगावबांधच्या उद्यानात पर्यटन करीत असताना त्यांच्यासह धाबेपवनी येथील रहिवासी भीमसेव श्रीनारायण डोंगरवार होता. दरम्यान २६ जानेवारी २०१२ रोजी सायंकाळी ७ ते ७.३० वाजताच्यादरम्यान त्यांचा महागडा कॅमेरा त्यांच्या निवासाच्या ठिकाणावरून चोरीला गेला. त्यानंतर बावीसकर व त्यांच्या मित्रांनी वसतिगृहाच्या परिसरात कॅमेऱ्याचा शोध घेतला, मात्र कॅमेरा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी नवेगावबांध पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. पोलिसांनी कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा नोंद केला होता. पोलिसांना कॅमेरा चोराचा शोध लागला नाही. मात्र डॉ.बावीसकर यांना पर्यटनप्रसंगी सोबत फिरणारा भीमसेन डोंगरवार याच्यावर संशय होता. बावीसकर व त्यांच्या मित्रांनी या कालावधीत डोंगरवारवर पाळत ठेवली. दरम्यान कॅमेरा डोंगरवार कडेच असल्याची त्यांची खात्री पटली. बावीसकर यांनी कॅमेरा हस्तगत करून डोंगरवार यांना अटक करण्यासाठी साकोली पोलिसांची मदत मागितली. पोलिसांनी डोंगरवार यांना विशिष्ट कामासाठी साकोलीच्या टोलनाक्याजवळ बोलावले. यावेळी कॅमेरा डोंगरवारजवळच होता. हीच संधी साधून पोलिसांनी त्याला अटक केली. कॅमेरा चोरीचा गुन्हा नवेगावबांध पोलीस ठाण्यात दाखल असल्यामुळे मंगळवारी ४ नोव्हेंबर रोजी साकोली पोलिसांनी भीमसेन डोंगरवारला नवेगावबांध पोलिसांच्या ताब्यात दिले. तपास अधिकारी पाटील यांनी संपूर्ण कागदपत्रांसह आरोपी डोंगरवारला न्यायालयात हजर केले. अशा प्रकारच्या गुन्ह्यांत वाढ झाल्याचे सांगून आरोपीला पोलीस कोठडी देण्याची न्यायालयाला मागणी केली. मात्र कॅमेरा परत (रिकव्हर) झाल्याने न्यायालयाने डोंगरवार याला पोलीस कोठडी न देता जामीन देवून सोडल्याचे नवेगावबांध पोलीस ठाण्याचे अधिकारी पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)