शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

चार लाखांच्या मदतीचा मेसेज बनावट; आलेल्या अर्जाचे करायचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 05:00 IST

आपल्या कुटुंबातील व्यक्ती कोरोनामुळे आम्ही गमावला त्यामुळे शासन आम्हाला मदत म्हणून चार लाख रुपये देत असल्याची खोटी वार्ता सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात पसरली. अर्ज कसे करावेत यासंदर्भात त्यात माहिती व अर्जाचा नमुना आहे. शासनाने अशी कुठलीही योजना सुरू केली नाही. त्यामुळे बनावट मेसेजच्या नादात लोकांनी पडू नये. या बनावट मेसेजच्या नादात पडून माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात लोक येत आहेत.

नरेश रहिलेलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  कोविड-१९ ने मृत्यू पावलेल्या लोकांना शासन ४ लाखांची मदत करत असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोरोनामुळे आपल्या कुटुंबातील व्यक्ती गेला त्यामुळे या व्हायरल मॅसेजमुळे लोक अर्ज करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. शासनाने काेविडने मृत्यू झालेल्या सामान्य माणसांना कसलीही मदत जाहीर केली नाही. त्यामुळे ह्या बनावट मेसेजचा त्रास जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय व आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाला होत आहे. आपल्या कुटुंबातील व्यक्ती कोरोनामुळे आम्ही गमावला त्यामुळे शासन आम्हाला मदत म्हणून चार लाख रुपये देत असल्याची खोटी वार्ता सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात पसरली. अर्ज कसे करावेत यासंदर्भात त्यात माहिती व अर्जाचा नमुना आहे. शासनाने अशी कुठलीही योजना सुरू केली नाही. त्यामुळे बनावट मेसेजच्या नादात लोकांनी पडू नये. या बनावट मेसेजच्या नादात पडून माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात लोक येत आहेत.

आपत्ती व्यवस्थापनाकडे केली ५०० लोकांनी विचारणाया बनावट मेसेजला पाहून जिल्ह्यातील कोविडमुळे मृत झालेल्या लोकांच्या कुटुंबातील लोक चार लाख रुपये शासन देत आहे का? यासाठी अर्ज कसे करावे ही माहिती घेण्यासाठी जवळजवळ ५०० लोकांनी यासंदर्भात विचारणा केल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी सांगितले. शासनाची अशी योजना नाही, असे सांगून येणाऱ्यांना परत पाठविण्यात आले.

या अर्जाचे काय करणार?अनेक लाेकांनी त्या मेसेजमधील अर्जाचा नमुना दिला आहे. त्या अर्जाच्या नमुन्याची झेरॉक्स काढून त्यात माहिती भरून लोक तो अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात आणून देत आहेत. शासनाची योजनाच नसल्याने या अर्जांना कचऱ्याच्या टोपलीत टाकले जाणार आहे.

अर्ज करू नका अशी कुठलीही योजना नाही!

कोविडने मृत झालेल्या सर्वसामान्य लोकांना मदत म्हणून चार लाख रुपये देण्यात येतील, अशी शासनाची कुठलीही योजना नाही. योजनाच नाही तर अर्ज करणे चुकीचे आहे. खोट्या मेसेजच्या आधारावर अर्ज करणे योग्य नाही.- नयना गुंडे, जिल्हाधिकारी गोंदिया. 

काय आहे बनावट मॅसेज?बनावट मॅसेजमध्ये कोविडने मृत पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना ४ लाखाची मदत शासन देणार आहे. त्यासाठी मृतकची पत्नी, मुलगा, मुलगी यांच्या नावाने अर्ज करावे, मृतकाचे नाव, मृत्यूची तारीख, पूर्ण पत्ता, मृतकाचा आधारक्रमांक, मृतकाचे अर्जदाराशी असलेले नातेसंबंध, मृत्यू प्रमाणपत्र, मृताचा रुग्णालयाचा दाखला व खाते क्रमांक नमूद करण्याच्या सूचना त्या मेसेजमध्ये आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू