शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

पगार न झाल्यास बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 06:00 IST

शासनाने २८ फेब्रुवारी २०१८ रोजी १४६ आणि १३ सप्टेंबर २०१९ ला १६३८ विना अनुदानीत शाळांना अनुदान देण्याची घोषणा केली. यानंतर उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी करण्यासाठी १८ व २१ ऑक्टोबर २०१९ रोजी शिक्षण संचालक पुणे यांनी राज्यातील सर्व उपसंचालकांना १ ते ५९ कॉलमची माहिती मागविली होती.

ठळक मुद्देकृती संघटनेचा इशारा : शासनाने दखल घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विनाअनुदानीत शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांना मागील पंधरा ते वीस वर्षांपासून वेतन मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे येत्या दहा ते पंधरा दिवसात पगार न झाल्यास आगामी बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयीन शाळा कृती संघटना गोंदिया शाखेतर्फे देण्यात आला आहे.संघटनेने त्यांच्या मागण्यांकडे शिक्षण विभागाचे लक्ष वेधण्यासाठी नागपूर येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. हे धरणे आंदोलन आ.नागो गाणार यांच्या नेतृत्त्वात करण्यात येणार होते. मात्र ते पोहचलेच नाही. त्यामुळे संघटनेने याबद्दल संताप व्यक्त केला.शासनाने २८ फेब्रुवारी २०१८ रोजी १४६ आणि १३ सप्टेंबर २०१९ ला १६३८ विना अनुदानीत शाळांना अनुदान देण्याची घोषणा केली. यानंतर उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी करण्यासाठी १८ व २१ ऑक्टोबर २०१९ रोजी शिक्षण संचालक पुणे यांनी राज्यातील सर्व उपसंचालकांना १ ते ५९ कॉलमची माहिती मागविली होती. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व शिक्षण शिक्षणाधिकारी कार्यालय या ठिकाणी सर्व उच्च माध्यमिक शाळांनी ११ व १३ नोव्हेंबरपर्यंत माहितीची फाईल पूर्ण करून जमा केली. त्यानुसार या शाळांना वेतन व पगार मिळण्यासाठी येणाऱ्या नागपूर येथील अधिवेशनात आर्थिक तरतूद पुरवणी मागणीद्वारे करण्यात येणार होती. परंतु ती आर्थिक तरतूद सहा दिवस चाललेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मंजूर होऊ शकली नाही. वरील घोषित १४६ व १६६८ तसेच मंत्रालय स्तरावरील कॉलेजची वेतन निश्चितीसह ५९ मुद्यांची माहिती संचालक कार्यालयाकडून दोन महिन्यापूर्वी मागविलेली होती.सदर माहिती वेळेत पोहोचली नसल्याने वरील कॉलेजची पुरवणी मागणी डिसेंबर २०१९ मधील अधिवेशनात होऊ शकली नाही. त्यामुळे १३ सप्टेंबर २०१९ व २८ फेब्रुवारी २०१८ च्या शासन निर्णयान्वये या कॉलेजला आर्थिक तरतूद करून वेतन सुरू करावे असा स्पष्ट जीआर आहे. त्यामुळे शासनाने या जीआरची अंमलबजावणी करुन शिक्षकांचे पगार त्वरीत करावे. अन्यथा बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.मागील पंधरा ते वीस वर्षांपासून शिक्षकांना वेतन मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर वेतनाच्या प्रतीक्षेत गोंदिया येथील एका शिक्षकाचा बळी गेला असून याला केवळ शासन आणि शिक्षण विभागाच जबाबदार आहे. त्यामुळे शिक्षकांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांना त्वरीत वेतन देण्यात यावे अशी मागणी संघटनेचे नागपूर विभागीय सचिव प्रा.कैलास बोरकर, महिला अध्यक्ष प्राध्यापिका सरोदे, प्रा.एच.डी.समरीत, नागपूर विभागीय महिला सचिव प्राध्यापिका अर्चना उरकुडे, सचिव प्रा.मेहर, एस.एस बन्सोड, आर.एस जगणे, एस.डी.येळे, एम.ए.उके, सोनू कटरे, अनिता बनवले यांनी केली आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक