वीज बिल माफ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 05:00 AM2020-07-01T05:00:00+5:302020-07-01T05:00:48+5:30

शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक कर्ज त्वरीत देण्यात यावे तसेच घरकुल बांधकाम आणि शासकीय कामे रेती अभावी बंद पडून असल्याने त्यांना त्वरीत रेती उपलब्ध करुन द्यावी आदि मागण्या भाजपच्यावतीने करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.

Excuse the electricity bill | वीज बिल माफ करा

वीज बिल माफ करा

Next
ठळक मुद्देग्राहकांना फटका : मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरीक, मजूर, किरकोळ व्यापाऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. आधीच कोरोनात रोजगाराचं संकट व त्यात वीज बिल जास्त आल्याने अनेकांवर मोठे संकट ओढावले आहे. अशात शासनाने वीज बिल माफ करावे तसेच शेतकऱ्यांना पीक त्वरीत देण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली असून तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे.
लॉकडाऊनच्या काळात विजेचा घरगुती वापर जास्त झाला आहे. शिवाय विजेचे दरही वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांना वीज बिल जास्त आले आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने पाठविलेले वारेमाप बिल भरणे जनसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे वीज बिल माफ करण्यात यावे. तसेच शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक कर्ज त्वरीत देण्यात यावे तसेच घरकुल बांधकाम आणि शासकीय कामे रेती अभावी बंद पडून असल्याने त्यांना त्वरीत रेती उपलब्ध करुन द्यावी आदि मागण्या भाजपच्यावतीने करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
निवेदन देताना भाजप तालुकाध्यक्ष अशोक लंजे, महाराष्ट्र भाजप आदिवासी आघाडीचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये, पंचायत समिती सभापती गिरधारी हत्तीमारे, उपसभापती राजेश कठाणे, विश्वनाथ रंहागडाले, बालकदास राऊत, दिलीप बोरकर, शिशीर येळे, विलास बागळकर यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.

Web Title: Excuse the electricity bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज