सर्वांनी कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांची अंमलबजावणी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 05:00 AM2020-07-04T05:00:00+5:302020-07-04T05:00:27+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात कोरोनाविषयी मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने गुरूवारी (दि.२) आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. या वेळी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले,प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भारतभूषण रामटेके व डॉ. नितीन कापसे प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. बलकवडे यांनी, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

Everyone should follow the corona prevention instructions | सर्वांनी कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांची अंमलबजावणी करावी

सर्वांनी कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांची अंमलबजावणी करावी

googlenewsNext
ठळक मुद्देकादंबरी बलकवडे : नियमांचे उल्लंघन केल्यास विशेष मोहिमेतून कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग होणार नाही यासाठी प्रत्येक नागरिकाने दक्षता घेणे आवश्यक आहे. शासनाकडून वेळोवेळी काढण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी न करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध सक्त कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात कोरोनाविषयी मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने गुरूवारी (दि.२) आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. या वेळी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले,प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भारतभूषण रामटेके व डॉ. नितीन कापसे प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. बलकवडे यांनी, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु प्रशासनामार्फत नागरिकांना देण्यात आलेल्या सूचनांची नागरिकांकडून काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. जो कोणी नियम मोडेल त्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे सांगीतले.
तसेच, लॉकडाऊन कालावधीत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे सांगत त्यांनी, विनाकारण फिरणाºया नागरिकांवर, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर, मास्क न वापरणाऱ्यांवर तसेच मास्क इकडे-तिकडे फेकणाऱ्यांवर, सुरक्षित शारीरिक अंतर (फिजिकल डिस्टन्सिंग) न ठेवणाऱ्यांवर, गर्दी करणाऱ्यांवर, ५ पेक्षा अधिक नागरिक एकत्र झाल्यावर, स्वच्छता न पाळल्यास आदि बाबी निदर्शनास आल्यावर त्यांच्याविरूद्ध विशेष मोहीम राबवून पोलीस व महसूल विभागाच्या भरारी पथकांना विशेष मोहिमेंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश दिले.
कोरोनात व्यक्तीला ताप, खोकला, सर्दी तसेच गंध न येणे, तोंडाची चव (स्वाद) जाणे, अतिसार (डायरिया) ही सर्व लक्षणे आहेत. कोणत्याही व्यक्तीला अशाप्रकारची लक्षणे असल्यास त्यांनी त्वरीत आरोग्य यंत्रणेच्या जिल्हास्तरीय कोरोना सल्ला केंद्रात ८३०८८१६६६६ व ८३०८८२६६६६ या क्रमांकावर संपर्कसाधून आपल्या शंकांचे निराकरण करावे.
आपल्या परिसरात आजाराची लक्षणे असलेल्या नागरिकांनी या बाबतची माहिती वरील क्रमांकावर द्यावी. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असेही त्यांनी सांगीतले.

येणाऱ्या-जाणाऱ्यांची नोंद करा
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्हयातील सर्व आस्थापना, दुकान, संस्था, संघटना, कार्यालयांना त्यांच्या आस्थापनात येणाºया सर्व नागरिकांची नोंद नोंदवहीमध्ये करणे आवश्यक आहे. असे न आढळल्यास त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्यात येईल असे डॉ. बलकवडे यांनी स्पष्ट केले. शिवाय, आस्थापना व दुकानदारांनी शक्यतो कॅश ऐवजी ई-पेमेंट स्वीकारावा असेही त्यांनी याप्रसंगी सांगीतले.

Web Title: Everyone should follow the corona prevention instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.