प्रत्येकाला स्वभाषेचा अभिमान असावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 05:00 AM2020-01-14T05:00:00+5:302020-01-14T05:00:16+5:30

वाणिज्य व इंदिराबेन हरिहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालयात भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त मराठी वाङमय मंडळव्दारा आयोजित ‘मराठी भाषा संवर्धन काळाची गरज’ या विषयावरील व्याख्यानात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

Everyone should be proud of nature | प्रत्येकाला स्वभाषेचा अभिमान असावा

प्रत्येकाला स्वभाषेचा अभिमान असावा

Next
ठळक मुद्देएन.वाय.लंजे : जगत महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : मराठी आपली मातृभाषा असून मराठी माणसाने मराठीतूनच बोलले पाहिजे. आपली भाषा जपणे ही काळाची गरज आहे.प्रत्येक व्यक्तीला आपल्या स्वभाषेचा अभिमान असावा असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.एन.वाय.लंजे यांनी केले.
येथील जगत कला, वाणिज्य व इंदिराबेन हरिहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालयात भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त मराठी वाङमय मंडळव्दारा आयोजित ‘मराठी भाषा संवर्धन काळाची गरज’ या विषयावरील व्याख्यानात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
प्रमुख वक्ते म्हणून शहीद जान्या-तिम्या आंतरराष्ट्रीय शाळेतील मराठी विषयाचे प्रा. मोरेश्वर पटले तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. एच. भैरम, मराठी विभागप्रमुख डॉ. चंद्रकुमार राहुले, ग्रंथपाल प्रा. एकनाथ चंदनखेडे, प्रा. लोकेश कटरे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली.
याप्रसंगी प्रा.पटले यांनी,मराठी भाषेचा होत असलेला ऱ्हास ही चिंताजनक बाब आहे.त्याकरीता मराठी भाषा बोलणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषेचे संवर्धन व जतन करणे ही काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राहुले यांनी मांडले. संचालन प्रा.लोकेश कटरे यांनी केले. आभार प्रा.एकनाथ चंदनखेडे यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Everyone should be proud of nature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.