शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

दरवर्षी २५ टक्के कामे रखडतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 06:00 IST

जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत सन २०१६-१७ पासून २०१९-२० पर्यंत ८१ हजार २७ कामे सुरू करण्यात आली. यातील ६४ हजार ६१० कामे पूर्ण करण्यात आलीत. सन २०१६-१७ मध्ये ४१ हजार २१९ कामांपैकी ३७ हजार ९९८ कामे पूर्ण झाली आहेत. त्या वर्षातील ३ हजार २२१ कामे अपूर्ण आहेत. सन २०१७-१८ या वर्षात २३ हजार ५२५ पैकी १८ हजार २१० कामे पूर्ण झाली आहेत.

ठळक मुद्देरोहयोकडे सपशेल दुर्लक्ष । मागील तीन वर्षात सुरू केलेली १६४१७ कामे रखडलेली

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत दरवर्षी सुरू करण्यात येणाऱ्या कामांपैकी २५ टक्के कामे रखडतात. जिल्ह्यात मागच्या तीन वर्षात सुरू करण्यात आलेल्या कामांपैकी २५ टक्के कामे अपूर्ण आहेत. मागील तीन वर्षाची परिस्थिती पाहता १६ हजार ४१७ कामे अपूर्ण असल्याची माहिती पुढे आली आहे.जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत सन २०१६-१७ पासून २०१९-२० पर्यंत ८१ हजार २७ कामे सुरू करण्यात आली. यातील ६४ हजार ६१० कामे पूर्ण करण्यात आलीत. सन २०१६-१७ मध्ये ४१ हजार २१९ कामांपैकी ३७ हजार ९९८ कामे पूर्ण झाली आहेत. त्या वर्षातील ३ हजार २२१ कामे अपूर्ण आहेत. सन २०१७-१८ या वर्षात २३ हजार ५२५ पैकी १८ हजार २१० कामे पूर्ण झाली आहेत.५ हजार ३१५ कामे अपूर्ण आहेत. दरवर्षीच्या अपूर्ण असलेल्या कामांची मोठी संख्या पाहता सन २०१८-१९ मध्ये १२ हजार ९२७ कामे सुरू करण्यात आलीत. यापैकी ७ हजार ५१७ कामे पूर्ण झाली आहेत. ५ हजार ४१० अपूर्ण आहेत. सन २०१९-२० मध्ये आतापर्यंत ३ हजार ३५६ कामे सुरू करण्यात आली आहेत. यापैकी फक्त ८८५ कामे पूर्ण होऊ शकले. २ हजार ४७१ कामे अपूर्ण आहेत.जिल्ह्यात मनरेगाची कामे उपलब्ध करून दिली जात नाही. दरवर्षी लाखो मजुरांच्या हाताला मागेल तेवढ्या दिवस काम उपलब्ध करून दिले जात होते. परंतु ही योजना राबविणाऱ्या यंत्रणेकडून सतत दुर्लक्ष होत असल्यामुळे कामेही पूर्ण होत नाही. तसेच मजुरांमध्ये बेरोजगारी वाढत आहे. नोव्हेंबर महिन्यात ९ हजार ४४ कुटुंबाना कामे देण्यात आली आहेत. डिसेंबर महिन्यासाठी काम मागणाºया मजुरांची संख्या गोंदिया २५१, सडक-अर्जुनी १५७, तिरोडा २०४, गोरेगाव ४५, अर्जुनी-मोरगाव १०, आमगाव २, देवरी ३ कुटुंबाचा समावेश आहे. सालेकसा तालुक्यातील एकही कुटुंब नाही.३३.५२ टक्के मजूर विनाआधारशासन-प्रशासनाद्वारे लोकांचे बँंक खाते आधार कार्डाशी जोडले जात आहे. शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार आवश्यक करण्यात आले. परंतु आताही अनेक लोक आधारकार्डविना आहेत. जिल्ह्यातील ३३.५२ टक्के मजुरांच्या जवळ आधार कार्ड नाही. जिल्ह्यात ७ लाख ३५ हजार ४६२ मजूर आहेत. यापैकी ४ लाख ८८ हजार ८९७ मजुरांकडे आधारकार्ड आहे.यापैकी ३ लाख ९५ हजार १५४ आधारकार्ड व्हेरीफाय करण्यात आले. २ लाख ४६ हजार ५६५ मजूर विना आधारकार्ड आहेत. परंतु ९९४ लोकांकडे आधारकार्डसोबत डाक कार्यालयाचे खाते आहे. बँक खाते उघडणाऱ्यांची संख्या ४ लाख ३८ हजार ४८६ आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद