कोरोना व्यवस्थापनासाठी टास्क फोर्सची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 05:00 AM2020-06-27T05:00:00+5:302020-06-27T05:00:58+5:30

जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढले असूनही फक्त मोजकेच उपचारात आहेत. अशात कोरोनाचे व्यवस्थापन करण्यासाठी रूग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्सला मार्गदर्शन करणे गरजेचे असून यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. या टास्क फोर्समध्ये विविध शाखांतील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे.

Establishment of Task Force for Corona Management | कोरोना व्यवस्थापनासाठी टास्क फोर्सची स्थापना

कोरोना व्यवस्थापनासाठी टास्क फोर्सची स्थापना

googlenewsNext
ठळक मुद्देउपचार करणाऱ्या डॉक्टर्सला करणार मार्गदर्शन : विविध शाखांतील तज्ज्ञांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढले असूनही फक्त मोजकेच उपचारात आहेत. अशात कोरोनाचे व्यवस्थापन करण्यासाठी रूग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्सला मार्गदर्शन करणे गरजेचे असून यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. या टास्क फोर्समध्ये विविध शाखांतील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे.
राज्याच्या टोकावर तसेच मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या आदिवासी, नक्षलग्रस्त व अतिदुर्गम असलेला गोंदिया जिल्हा तिसऱ्यांदा करोना मुक्तीच्या वाटेवर आहे. मात्र सातत्याने वाढ होत असलेली रूग्ण संख्या बघता कोरोनाचे व्यवस्थापन करणे गरजेचे झाले आहे.
यासाठी रूग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्सला वेळोवेळी मार्गदर्शन करणे सुद्धा गरजेचे आहे. यातूनच जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी जिल्ह्यात स्थापन केलेल्या कोविड केअर सेंटरसाठी स्पेशल टास्क फोर्सची स्थापना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. हिम्मत मेश्राम यांच्या संकल्पनेतून या स्थापित करण्यात आलेल्या या जिल्हास्तरीय टास्क फोर्समध्ये मेडीसिन भिषकतज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, सर्जन्स, युरोसर्जन्स, न्युरॉलॉजीस्ट, मनोविकारतज्ञ, नेत्रतज्ञ, शरीरविकृती शास्त्रज्ञ, हिमॅटॉलॉजीस्ट यांचा समावेश करण्यात आला आहे. कोवीड बाधित रुग्णांवर उपचार करताना त्यांना कोरोना सोबतच उच्चरक्तदाब, शुगर, हार्ट प्रॉब्लेम, मधूमेह इतर आजार असल्यास त्याचे त्वरित निदान करुन उपचार करण्यात येतो.
रूग्णांच्या कोविड केअर सेंटरमध्ये २४ तास ७ ही दिवस ड्यूटी करणाऱ्या डॉक्टरांना या जिल्हास्तरीय टास्क फोर्सचे मार्गदर्शन मिळत असून त्यामुळेच जिल्ह्यात १०४ रूग्ण बाधित असूनही १०२ रूग्ण बरे होऊन घरी गेलेत. तसेच एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही.

टास्क फोर्समध्ये यांचा समावेश
येथील क्रीडा संकुल, पॉलीटेक्नीक कॉलेज व आयुर्वेदिक कॉलेज या ३ कोवीड केअर सेंटरमध्ये रूग्णांवर उपचार करणाºया डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हास्तरीय टास्क फोर्सची स्थापना करण्यात आलेली आहे. या जिल्हास्तरीय टास्क फोर्समध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मेडिसीन विभाग प्रमुख डॉ. प्रशांत पाटील, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. देशमुख, सर्जन्स डॉ. मनिष सिंग, डॉ. प्रशांत तुरकर, आसीसीयू तज्ज्ञ डॉ. विनोद मोहबे, डॉ. राजेंद्र वैद्य, नेत्रतज्ञ डॉ. निकिता पोयाम, डॉ. संजय माहुले, डॉ. सुवर्णा हुबेकर, डॉ. अविनाश येरणे, डॉ. यामिनी येळणे आदिंचा समावेश असून ते सेवा देत आहेत.

Web Title: Establishment of Task Force for Corona Management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.