शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
3
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
4
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
5
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
6
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
7
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
8
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
9
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
10
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
11
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
12
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
13
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
14
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
15
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
16
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
17
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
18
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
19
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
20
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण संरक्षण आणि नैसर्गिक स्त्रोतांवर जनजागृती

By admin | Updated: June 13, 2014 00:17 IST

अदानी पॉवर महाराष्ट्र लिमीटेडच्या वतीने अदानी फाउंडेशनतर्फे पर्यावरण संरक्षण आणि नैसर्गिक स्त्रोतांचे संवर्धन यावर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चार दिवसांच्या या कार्यक्रमात

गोंदिया : अदानी पॉवर महाराष्ट्र लिमीटेडच्या वतीने अदानी फाउंडेशनतर्फे पर्यावरण संरक्षण आणि नैसर्गिक स्त्रोतांचे संवर्धन यावर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चार दिवसांच्या या कार्यक्रमात विविध स्पर्धा घेऊन विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.


जनजागृतीपर कार्यक्रमांतर्गत पर्यावरणाचे महत्व सांगणारे स्लोगन, पोस्टर, रांगोळी, वादविवाद स्पर्धा घेण्यात आल्या. यादरम्यान काचेवानी येथे आदर्श गाव आणि पर्यावरण संवर्धनावर एक सिनेमाही दाखविण्यात आला. तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी काय केले पाहीजे आणि काय नाही केले पाहीजे यावर पत्रके वाटण्यात आली. यावेळी अदानी फाऊंडेशनने दहा कलमी कार्यक्रम राबवून परिसरातील गावांमध्ये कोणकोणती कामे केली याबद्दलची माहिती कर्मचारी, कंत्राटी कामगार आणि गावकऱ्यांना दिली. समारोपीय कार्यक्रमाला पर्यावरण विभागाचे प्रमुख ए.पी.सिंग, तिरोडा विभागाचे प्रमुख सी.पी.साहू, प्रकल्प प्रमुख ओ.पी.भारद्वाज यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना भारद्वाज यांनी अदानी फाऊंडेशनच्या वतीने पर्यावरणविषय अनेक कार्यक्रम आतापर्यंत राबविल्याची माहिती दिली. त्यात प्रामुख्याने गावतलावांचे खोलीकरण, जंगलातील लाकडांची कटाई थांबविण्यासाठी चोरखमारा आणि सर्रा गावात गॅस सिलींडरचे वितरण, तसेच गोबरगॅस आणि सौरउर्जेवरील पथदिवेही लावल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. जलशुद्धीकरण प्रकल्पाची उभारणी करण्यासाठीही अदानी फाऊंडेशन तयार आहे, मात्र त्याच्या सुरक्षेची आणि देखभालीची जबाबदारी ग्रामपंचायतने घ्यावी, असे आवाहन यावेळी भारद्वाज यांनी केले.


यावेळी साहू यांनी वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावण्याचे आवाहन नागरिकांना केले. अदानी प्रकल्प आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असल्यामुळे पर्यावरणाचे कमीत कमी नुकसान होत असल्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी अनेक विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)