शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात वीज गळतीचे प्रमाण २१ टक्के

By admin | Updated: September 30, 2014 23:37 IST

दुर्गोत्सवातील झगमगाटासाठी मोठ्या प्रमाणात गोदिया शहरात वीज चोरी होत असल्यामुळे वीज गळतीचे प्रमाण तब्बल २१ टक्के झाले आहे. त्यामुळे ऐन सण उत्सावातच वीज वितरण कंपनीला

वीज चोरीला फटका : सहा तासांच्या भारनियमनाने सारेच त्रस्तगोंदिया : दुर्गोत्सवातील झगमगाटासाठी मोठ्या प्रमाणात गोदिया शहरात वीज चोरी होत असल्यामुळे वीज गळतीचे प्रमाण तब्बल २१ टक्के झाले आहे. त्यामुळे ऐन सण उत्सावातच वीज वितरण कंपनीला भारनियमन सुरु करावे लागले. तब्बल तीन-तीन तासाप्रमाणे दिवसभरात सहा तासाचे भारनियमन सुरू केल्याचे शहरवासीयांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरत आहे. महावितरण कंपनी वीज चोरट्यांवर आळा घालण्याऐवजी सरळ वीज ग्राहकांना त्याची शिक्षा देऊन आपले कर्तव्य पार पाडत नसल्यामुळे वीज ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे. गोंदिया विभागात ४२ फिडर आहेत. त्यातल्या त्यात गोंदिया शहरात आठ फिडर असून ते वेगवेगळ्या भागात विभागले गेले आहेत. गोंदिया टाऊन एक हा परिसर माताटोली व बाजार परिसर असल्याने येथील विज चोरी बरीच असल्यामुळे या ठिकाणी ६ तास १५ मिनिटाचे भारनियमन केले जाते. गोंदिया टाऊन दोन या परिसरात गोंदिया शहर मुख्य बाजार व माताटोलीचा काही परिसर असल्यामुळे या ठिकाणातूनही वीज चोरीचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे या ठिकाणीही ६ तास १५ मिनिटाचे भारनियमन करण्यात येत आहे. गोंदिया टाऊन ३ मध्ये माताटोली मनोहर चौक परिसर येत असल्यामुळे या ठिकाणी वीज चोरीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या ठिकाणी ७ तासांचे भारनियमन केले जात आहे. गोंदिया टाऊन चार हे फिडर शहरातील नागरिकांसाठी आहे. मात्र या ही ठिकाणी आकडा टाकुन किंवा मिटरमध्ये बिघाड करुन विद्युत चोरी केली जात असल्यामुळे विज गळती मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी या फिडरवरुन ५ तास ३० मिनिटाचे भारनियमन करण्यात येते. गोंदिया टाऊन ५ हा परिसर रामनगर व रेलटोलीचा असल्यामुळे याठिकाणातुनही विज चोरी होत आहे. या ठिकाणी ५ तास ३० मिनिटाचे भारनियम केले जाते. मनोहर चौक फिडरमध्ये ही ५ तास ३० मिनिटाचे भारनियमण केले जाते. तर सिव्हिल लाईन फिडरवरुन ४ तास ४५ मिनिटाचे भारनियमन करण्यात येत आहे. या भारनियमनामुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले असून नागरिक मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे. (तालुका प्रतिनिधी)