शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जप्तीची कारवाई कागदोपत्री,प्रकल्प मात्र सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 22:22 IST

गंगेझरी येथील हॉट मिक्स डांबर प्लांट प्रकरणात अर्जुनी-मोरगावच्या तहसीलदारांनी केलेली जप्तीची कारवाई ही देखावा असून मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर या पद्धतीची असल्याचा आरोप केला जात आहे. जप्तीची कारवाई झाली असली तरी प्लांट मात्र अद्यापही सुरु असल्याने विविध चर्चांना उत आले आहे.

ठळक मुद्देहॉट मिक्स डांबर प्लांट प्रकरण संदिग्ध : जिल्हाधिकारी घेणार का प्रकरणाची दखल

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : गंगेझरी येथील हॉट मिक्स डांबर प्लांट प्रकरणात अर्जुनी-मोरगावच्या तहसीलदारांनी केलेली जप्तीची कारवाई ही देखावा असून मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर या पद्धतीची असल्याचा आरोप केला जात आहे. जप्तीची कारवाई झाली असली तरी प्लांट मात्र अद्यापही सुरु असल्याने विविध चर्चांना उत आले आहे.सोमलपूर गट ग्रामपंचायत अंतर्गत मौजा गंगेझरी येथील शासकीय भुमापन क्रं.१६ मधील १.१० हे.आर.जागेपैकी ०.६० जागेवर डांबर प्लांट उभारण्यात आले आहे. या जागेवर प्लांट उभारण्यापूर्वी महसूल विभागाची परवानगी घेण्यात आली नाही. फेबु्रवारी महिन्यापासून येथे प्लांट सुरु असतांनाही संबंधित तलाठी व तालुका प्रशासन धु्रतराष्ट्राची भूमिका बजावत होते.९ मे रोजीच्या अंकात ‘डांबर प्लांटमुळे पर्यावरणाला धोका’ या मळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच यंत्रणा कामाला लागली. या प्रकरणात लोकमतने अधिक चौकशी केली असता अनेक वास्तव पुढे आले. ही जागा शासन मालकीची असतांनाही सोमलपूर ग्रामपंचायतने ५ फेबु्रवारी रोजी विशेष मासिक सभा घेऊन या डांबर प्लांटसाठी अर्जदार अंकीत फत्तेहसिंह चव्हाण यांना ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा ठरवाव पारित करण्यात आला. ना हरकत प्रमाणपत्र देण्यापूर्वी ही जागा प्रतिवर्ष २५ हजार रुपये याप्रमाणे पाच वर्षासाठी देण्याचा लेखी करारनामा करण्यात आला. ज्या दिवशी विशेष मासिक सभा घेण्यता आली. नेमक्या त्याच दिवशी गोंदिया येथे जाऊन करारनामा करण्यात आला. करारनामा करण्यासाठी एवढी लगीनघाई का? हा सध्या चर्चेचा विषय आहे.अर्जुनी मोरगावचे तहसीलदार विनोद मेश्राम यांनी २० मे रोजी डांबर प्लांटला भेट दिली. प्लांटमालकाला दस्तावेजांची मागणी केली. त्यांनी ग्रा.पं.ने नाहरकत प्रमाणपत्र व महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र दाखविले. मात्र जागेसंदर्भात परवानगी पत्र नसल्याची कबूली प्लांटमालकाने दिली. त्यावेळी साहित्य जप्तीचा पंचनामा तयार करण्यात आला व लगेच फत्तेहसिंह चव्हाण यांना सुपूर्दनाम्यावर देण्यात आले. या ठिकाणी बारीक गिट्टीचा मोठ्या प्रमाणावर साठा आहे. त्याची नोंद जप्तीनाम्यात दिसून येत नाही. या गिट्टीची रॉयल्टी आहे किंवा नाही हे शंकास्पद आहे. डांबर प्लांटच्या मशिन मोठ्या आकाराच्या व त्या पक्क्या बांधकामाद्वारे बसविण्यात आल्यामुळे त्यांच्या देखभालीचा प्रश्न जप्तकर्त्या अधिकाऱ्यांना पडत होता. मात्र ट्रक, टिप्पर व जेसीबी हे जप्त केले असतानाही त्यांना तहसील कार्यालयात आणले जाऊ शकले असत.जप्तीतील वाहने जर तहसील कार्यालयात आणून ठेवले जात असतील तर या वाहनांना का आणण्यात आले नाही. हे सुद्धा एक कोडेच आहे. प्लांटमधील सर्व साहित्य सुपूर्दनाम्यावर दिल्यामुळे प्लांटचे काम २१ मे रोजी सुद्धा सुरु असल्याचे दिसून आले. त्या ठिकाणी असलेल्या गिट्टीची पुढील कारवाई होण्यापूर्वी वासलात लावण्यासाठी तर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली नाही ना? अशी परिसरात शंका व्यक्त केली जात आहे.दंडात्मक कारवाईस विलंबजमिनीचे झालेले नुकसान व आंबा फळाचे नुकसानीचा अहवाल तालुका कृषी अधिकाºयाकडून मागविण्यात आला आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्लांट मालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र ही कारवाई सुद्धा जप्तीच्या वेळेवर होऊ शकली असती.कारवाईच्या दिरंगाईबद्दल नेमके औचित्य कळायला मार्ग नाही. या जागेवरील एक प्रकारचे अतिक्रमण काढायला वरिष्ठांच्या परवानगीसाठी कागदी घोडे नाचविण्याचा प्रशासनाचा प्रकार आता सुरु होईल. यात आणखी किती विलंब होतो हे येणारा काळच सांगेल.

टॅग्स :environmentवातावरणforest departmentवनविभाग