शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. बाबासाहेबांनी दिलेले संविधान न्याय देण्यासाठी

By admin | Updated: December 26, 2015 02:00 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटच्या मानसापर्यंत न्याय मिळावा यासाठी संविधान देशाला दिले.

साकोली : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटच्या मानसापर्यंत न्याय मिळावा यासाठी संविधान देशाला दिले. मात्र बहुरूपी समाज आजही दारिद्रयात जीवन जगत आहे. या बहुरूपी समाजातील लोकांच्या समस्या नक्कीच मार्गी लावून त्यांना न्याय मिळवून देवून त्यांनाही स्वाभीमानाने जीवन जगण्यासाठी प्रयत्न करू, असे मत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी चारगाव येथे विदर्भस्तरीय बहुरूपी समाजाच्या भव्य मेळाव्याप्रसंगी व्यक्त केले. यावेळी मंचावर खा. नाना पटोले, आ. बाळा काशिवार, विदर्भ बहुरूपी समाज संघटनेचे अध्यक्ष ताराचंद माहुरे, उपसभापती लखन बर्वे, जिल्हा परिषद सदस्य नेपाल रंगारी, सामाजिक कार्यकर्ता बंडू बोरकर, पं.स. सदस्य जयश्री पर्वते, दमयंती राऊत, माजी उपसभापती श्रावण बोरकर, सरपंच रिता उईके, उपरपंच सुरेश लंजे, घनशाम सुतार, पोलीस पाटील गोपीनाथ लंजे उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बहुरूपी समाजातील गुणवंत विद्याथर्भ, कलावंत यांचा स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून हिवराज लंजे यांनी बहुरूपी समाजातील जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे, नोकरीत विशेष प्राधान्य देण्यात यावे, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत वसाहत बांधून देण्यात यावे, शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी केली. कार्यक्रमाचे संचालन शेखर माहुले यांनी तर आभार प्रदर्शन वासूदेव सुतार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता भक्तप्रल्हाद माहोेरे, संजय सुतार, ओमप्रकाश तांदुळकर, मोहन सुतार, प्रभू माहुले, रामक्रांत माहुले, लक्ष्मण सुतार, भैयालाल सुतार, दिगांबर सुतार, मनोहर तांदुळकर, राजु तांदुळकर व चारगाव वासीयांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)