शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

अनुदान थांबवू नका-पटेल

By admin | Updated: March 20, 2015 00:57 IST

महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व आंतरभारती शिक्षण संशोधन मंडळ, ...

गोंदिया : महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व आंतरभारती शिक्षण संशोधन मंडळ, संत बांगळुबाबा शैक्षणिक सुधारणा मंडळ यांच्या संयुक्त विद्ममाने जिल्हा पर्यटन महोत्सव कोसमतोंडी (नागझिरा) येथे पार पडला. मात्र म्हसवाणी येथील पवन शिक्षण संस्थेत महोत्सव झाल्याचे दाखवून त्याचा अनुदान निधी थांबविण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी अमित सैनी करीत असल्याचा आरोप राजू पटेल मलनस यांनी केला आहे.कोसमतोंडी येथील महोत्सव तत्कालिन आमदार व सध्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनामध्ये जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व आयोजक संस्थांव्दारे पार पडले होते. महोत्सवात नेते डॉ. खुशाल बोपचे, माजी आ. हेमंत पटले, माजी जि.प. अध्यक्ष नेतराम कटरे व माजी आ. रामरतनबापू राऊत, तुरकर, राजेश चतुर, पोलीस अधिकारी, तत्कालिन जिल्हा कृषी अधीक्षक मनोहर चंद्रिकापुरे, अविनाश काशिवार व जिल्ह्यातील हजारो कलावंत साहित्यीक व वरिष्ठ पत्रकार यांच्या उपस्थितीत पार पडले होते. सदर महोत्सवाचा खर्च आंतरभारती शिक्षण संशोधन मंडळ व संत बांगळुबाबा शैक्षणिक सुधारणा मंडळाने केला. याकरिता निधी मंजूर करण्यात आले व जिल्हाधिकारी गोंदिया यांना निधी संस्थेला वितरित करण्याचे आदेश दिले. संस्थेने कर्जाऊ रक्कम घेऊन महोत्सवावर खर्च केला. मात्र महोत्सव निधी जिल्हाधिकाऱ्यांकडून वितरित न झाल्यामुळे आयोजकांवर संकट ओढवले आहे. याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे विनंती केली आहे. अधिवेशन काळात तत्कालिन महोत्सवाचे अध्यक्ष आताचे सामाजिक न्यायमंत्री बडोले व खा. नाना पटोले यांना निवेदन देऊन प्रत्यक्ष जिल्हाधिकारी यांना फोन करून संस्थेला निधी वितरित करण्यासंबधी कळविले आहे. परंतु पवन शिक्षण संस्थेच्या मागणीनुसार म्हसवाणी येथे महोत्सव झाल्याचे जिल्हाधिकारी सैनी दाखवित असल्याचा आरोप राजू पटेल यांनी केला आहे. त्यामुळे कोसमतोंडी (नागझिरा) येथे झालेल्या महोत्सवाची शहानिशा करावी, पोलीस, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्यामार्फत चौकशी करावी. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही संस्थांना आमोरासमोर बोलवून निधी वाटप करावा अन्यथा शासनाचा अनुदान रोखून पर्यटन योजनेला बदनाम करणाऱ्या अधिकाऱ्यांना याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पर्यटनभूषण राजू पटेल मलनस यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)