शंभर मिमी पाऊस न झाल्यास पेरणी करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:22 IST2021-06-04T04:22:33+5:302021-06-04T04:22:33+5:30

गोंदिया : अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. अशात ८० ते १०० मिलिमीटर पाऊस ...

Do not sow unless there is 100 mm of rain | शंभर मिमी पाऊस न झाल्यास पेरणी करू नका

शंभर मिमी पाऊस न झाल्यास पेरणी करू नका

गोंदिया : अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. अशात ८० ते १०० मिलिमीटर पाऊस न झाल्यास पेरणी करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

२ ते ४ जून या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ५ जून रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खाते, कृषी हवामान शास्त्र विभाग (पुणे) यांनी वर्तविली आहे. अशात सोयाबीन, तूर, भुईमूग व मका या पिकांच्या नियोजनाकरिता पेरणीची पूर्वतयारीची कामे करावीत. तर विदर्भात भात पिकासाठी रोपवाटिकांची पूर्वतयारी चालू ठेवावी. खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन या पिकांसाठी जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीची निवड करून पूर्व मशागतीची कामे करावीत, असे कृषी विभागाचे सुचविले आहे. तर सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, मका या खरीप पीक पेरणीसाठी शेतजमीन नांगरणी व वखराच्या पाळ्या देऊन तयार करावी. राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी किमान ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. कारण अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. करिता ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो व खंड पडल्यास पीक तग धरू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

Web Title: Do not sow unless there is 100 mm of rain