शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
3
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
4
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
5
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
6
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
7
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
8
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
9
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
10
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
13
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
14
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
15
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
16
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
17
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
18
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
19
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
20
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट सर्वांत कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया :  ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्य शासनाने पाॅझिटिव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेडची उपलब्ध या आधारावर ...

ठळक मुद्देआठवडाभरात २० हजारांवर चाचण्या : १७३ पॉझिटिव्ह: जिल्हा पहिल्याच स्तरात कायम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्य शासनाने पाॅझिटिव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेडची उपलब्ध या आधारावर राज्यातील जिल्ह्याचे पाच स्तर करून त्या जिल्ह्यांमध्ये अनेक लॉक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दर आठवड्याला जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन निर्बंध शिथिल किंवा कडक करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. राज्य शासनाने शनिवारी (दि.११) यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली त्यात गोंदिया जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.८३ टक्के असून तो राज्यात सर्वांत कमी आहे.गोंदिया जिल्ह्याचा अनलॉकच्या पहिल्याच स्तरात समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. परिणामी मागील पाच दिवसांपासून सर्वच व्यवहारांची गाडी रूळावर आली आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना सुद्धा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात असून कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे दिलासादायक चित्र आहे. आठवडाभरात जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने एकूण २०७५७ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यात १७३ जण पॉझिटिव्ह आले असून त्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा ०.८३ टक्के आहे तर राज्यातील इतर जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट १ टक्क्यांहून अधिकच आहे. त्यामुळे ही जिल्हावासीयांसाठी निश्चितच दिलासादायक बाब आहे तर केवळ १.८ टक्के ऑक्सिजन बेड भरले असून मोठ्या प्रमाणावर बेड रिकामे आहे. हीसुद्धा जिल्हावासीयांच्या दृष्टीने समाधानकारक बाब आहे. जिल्ह्याचा पहिल्याचा स्तरात समावेश असल्याने सर्वच व्यवहार सुरळीत सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निर्बंध ‘जैसे थे’ राहणार आहेत.  

पुन्हा लॉकडाऊनची वेळ नकोच - गोंदिया जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट सातत्याने कमी होत आहे ही निश्चितच जिल्हावासीयांच्या दृष्टीने दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यावासीयांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन आणि योग्य खबरदारी घेतल्यास जिल्ह्यावर पुन्हा लॉकडाऊनची वेळ येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची आणि कुटुंबीयांची काळजी घ्यावी.  

कोरोनाची दुसरी लाट आता पूर्णपणे ओसरली आहे. कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेटसुद्धा राज्यात सर्वांत कमी आहे. त्याचे श्रेय जिल्ह्यातील जनतेलाच जाते. जशी काळजी जिल्ह्यावासीय आता घेत आहेत तशीच काळजी यापुढे घेत राहिल्यास जिल्हा निश्चितच लवकरच कोरोनामुक्त होईल. - राजेश खवले, जिल्हाधिकारी

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या